Sharad Pawar, Ajit Pawar Sarkarnama
महाराष्ट्र

Video NCP Crisis : मोठी बातमी! राष्ट्रवादी पक्ष, चिन्हावर आज होणार फैसला; सुप्रीम कोर्टात सुनावणी

Roshan More

NCP Crisis News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार गटाला मिळाले. निवडणूक आयोगाने या विषयी निर्णय दिला. हाच निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कायम ठेवला.

विधिमंडळातील सदस्यसंख्येच्या आधारे अजित पवार गटाला मूळ पक्ष नार्वेकर यांनी ठरवले होते. निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे लोकसभा निवडणुकीत अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसच्या 'घड्याळ' चिन्हावर लढला. तर, शरद पवार गट 'तुतारी' चिन्हावर लढला.

मात्र निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात शरद पवार गट सुप्रीम कोर्टात गेला होता. सुप्रीम कोर्टात यावर आज (मंगळवारी) सुनावणी होणार असून राष्ट्रवादी पक्ष, चिन्हावर कोणाचे यावर निर्णय होण्याचे शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीच्या काळात पक्ष आणि घड्याळ चिन्हावर अंतिम निर्णय झाला नसल्याचे शरद पवार गटाकडून कोर्टात सांगण्यात आले होते. सुप्रीम कोर्टाने देखील अजित पवार Ajit Pawar गटाला 'घड्याळ' चिन्ह वापरताना त्या खाली चिन्हा विषयीचा निकाल हा न्यायप्रविष्ठ असल्याच्या सूचना लिहिण्याचे तसेच या विषयी वर्तमानपत्रामधून जाहिरात प्रसिद्ध करण्याचे निर्देश दिले होते.

विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाला आव्हान

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर Rahul Narwekarयांनी देखील विधिमंडळातील संख्येच्या आधारे अजित पवार गटाला मूळ पक्ष ठरवले होते. तसेच दोन्ही गटातील आमदारांच्या अपात्रतेविषयी निर्णय देताना कोणालाही अपात्र ठरवले नव्हते. राहुल नार्वेकर यांच्या या निर्णया विरोधात देखील शरद पवार गटाकडून कोर्टात धाव घेण्यात आली होती.

लोकसभेत यश

'घड्याळ' चिन्ह नसताना देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने लोकसभेत मोठे यश मिळवले. 10 जागांवर उमेदवार पक्षाकडून देण्यात आले होते. त्यातील 8 जागांवर पक्षाने विजय मिळवला. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा स्ट्राइक रेट चांगला राहिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT