Asim Sarode Sarkarnama
महाराष्ट्र

Hasan Mushrif ED Case : मुश्रीफांना दिलासा की नवी डोकेदुखी? 100 कोटींच्या प्रकरणावर असीम सरोदेंचं मोठं भाष्य

Hasan Mushrif gets relief as PMLA court accepts ED closure report. Asim Sarode says the decision can still face a legal challenge. Read the details : 100 कोटींच्या कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीचा तपास बंद; न्यायालयाने क्लोजर रिपोर्ट स्वीकारला, मात्र काँग्रेस, शिवसेनेसह भाजपचे कार्यकर्तेही निर्णयाला आव्हान देऊ शकतात, असीम सरोदेंचा दावा.

Pradeep Pendhare

Hasan Mushrif PMLA Case : राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधातील सुमारे 100 कोटी रुपयांचं कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरण अंमलबजावणी संचालनालयाकडून बंद करण्यात आलं आहे.

यासंबंधीचा क्लोजर रिपोर्ट ईडीनं पीएमएलए कोर्टाला सादर केला असून कोर्टानं हा रिपोर्ट स्वीकारला आहे. पण हा क्लोजर रिपोर्ट न्यायालयाने स्वीकारला म्हणजे, विषय संपला नाही, असे म्हणत, कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी त्यांचे टेन्शन वाढवले आहे. काँग्रेस, शिवसेना आणि भ्रष्टाचाराचा राग असलेले भाजपचे कार्यकर्ते सुद्धा या निर्णयाला चॅलेंज देऊ शकतात, असे असीम सरोदे यांनी म्हटले आहे.

हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या कथित 100 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात न्यायालयाने क्लोजर रिपोर्ट स्वीकारला आहे. यावर कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी सोशली मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी हसन मुश्रीफ यांच्या कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणावर कायद्याच्या नजरेतून मोठे भाष्य करत, मुश्रीफ यांचे टेन्शन वाढवले आहे.

हसन मुश्रीफ यांच्या संदर्भातील क्लोजर रिपोर्ट न्यायालयाने (Court) स्वीकारला म्हणजे आता विषय संपला असे नाही. न्यायालयाने दिलेल्या क्लोजर रिपोर्ट मान्य करण्याच्या निर्णयाला चॅलेंज करता येते, असे असीम सरोदे यांनी म्हटले आहे.

100 कोटी रुपयांच्या कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाचा तपास बंद झाला, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. सामाजिक संवेदनशीलता असलेला, राजकीय कार्यकर्ता असलेला कुणीही नागरिक या निर्णयाला कायदेशीर आव्हान देऊ शकते. अनेकजण न्यायालयाचे दरवाजा ठोठावण्याची तयारी करीत आहेत, असेही असीम सरोदे यांनी म्हटले आहे.

अगदी काँग्रेस, शिवसेना आणि भ्रष्टाचाराचा राग असलेले भाजपचे कार्यकर्ते सुद्धा या निर्णयाला चॅलेंज देऊ शकतात. संपूर्ण निर्णयाचा अभ्यास करून त्याच्या कायदेशीर प्रक्रियेबाबत निच्छितता ठरविता येईल, असे म्हणत असीम सरोदे यांनी हसन मुश्रीफ यांचे टेन्शन वाढवले आहे.

काय आहे प्रकरण.....

कोल्हापुरातील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याशी संबंधित हे प्रकरण असून यामध्ये शेतकऱ्यांना कारखान्याचे भागधारक करण्याचे आश्वासन देऊन निधी गोळा केल्याचा आणि त्यात कथित गैरव्यवहार झाल्याचा आरोप होता. जून 2025 मध्ये मुंबई हायकोर्टाने मुरगूड पोलिस ठाण्यात नोंदवलेला मूळ एफआयआर पोलिसांच्या 'सी-समरी'अहवालानंतर रद्द केला होता. यात हसन मुश्रीफ आणि त्यांच्या तीन मुलांचा यात समावेश आहे. याप्रकरणी ईडीने तीन वेळा त्यांच्या घरावर छापेमारीही केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT