Jayant Patil News : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटवर महाराष्ट्र धर्म असे लिहित 'धर्मो रक्षति रक्षित:' या श्लोकाचा फोटो शेअर केला होता. जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांचे हे ट्विटला उत्तर देत भाजपच्या महाराष्ट्र धर्माची व्याख्या सांगत टीका केली आहे.
जयंत पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्र धर्माची भाजपची व्याख्या... महाराष्ट्रातून प्रकल्प गुजरातला घालवणे आणि राज्याची आर्थिक लूट करणे, विचारसरणीशी गद्दारी करण्यास प्रोत्साहन देणे, राज्यात बेरोजगारी वाढवून गुन्हेगारीला प्रोत्साहन देणे, शेतकऱ्यांच्या शेतमालाला रास्त भाव मिळून न देणे
आपल्या ट्विटमध्ये जयंत पाटील यांनी पुढे म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात सुद्धा पैसे खाणे आणि महाराजांच्या कर्तृत्वाचे श्रेय इतरांना देणे...म्हणजे भाजपचा महाराष्ट्र धर्म आहे.
शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळल्याची आठवण करून देताना हे महाराष्ट्राचे रक्षण कसे करणार ? असा प्रश्न देखील जयंत उपस्थित केला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार जयंत पाटली यांच्यावर टीका केली. अजित पवार म्हणाले, तुम्हाला साधी मतदारसंघातील नागरिकांची दिवाळी साजरा करता येत नाही आणि मुख्यमंत्री पदाची स्वप्न बघता. गावातील पोलिस स्टेशन बांधले नाही ते भाड्याच्या जागेत आहे अन् निघाले राज्याचे नेतृत्व कारायला,असा टोला जयंत पाटलांना अजित पवारांनी लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.