Jitendra Awhad, Rohit Pawar Sarkarnama
महाराष्ट्र

Jitendra Awhad Vs Rohit Pawar : ‘ते अजून लहान, पहिलीच टर्म’! आव्हाडांनी रोहित पवारांनाच सुनावलं

NCP : आव्हाडांच्या वक्तव्यावर पवारांनी व्यक्त केली होती नाराजी...

Rajanand More

Shirdi News : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या श्रीरामावरील वादग्रस्त वक्तव्यावर त्यांच्याच पक्षाचे आमदार रोहित पवारांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यावर आव्हाडांनी रोहित पवारांनाच सुनावलं आहे. रोहित पवार यांच्या बोलण्याकडे मी फार लक्ष देत नाही. ते अजून लहान आहेत, त्यांची पहिलीच टर्म आहे. अबुधाबीमध्ये जाऊन बोलणे खूप सोपे आहे, असा टोला आव्हाडांनी लगावला आहे.

आव्हाड यांनी गुरुवारी आपली भूमिका स्पष्ट केली. पक्षाच्या भूमिकेबाबत बोलताना ते म्हणाले, शरद पवारांचे नेहमी मला सांगणे असते की, सामाजिक बाजू मांडताना पक्ष त्याला जबाबदार नाही. पक्ष कधीही सामाजिक आशय ठरवत नाही. मी पुरंदरेंच्याविरोधात उतरलो, त्यावेळी तत्कालिन प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पुरंदरेंची माफी मागायला सांगितली होती. त्यावेळी मी जरा घाबरलो होतो, म्हणून पवारांना फोन केला. त्यांनी सांगितले की, तुझा अभ्यास आहे, तुला जे वाटते ते बोल. कारण पक्ष कुणाची सामाजिक भूमिका ठरवत नाही, असेही आव्हाड म्हणाले.

पक्षामध्ये मी एकटा पडलो असतो तर एवढे लोक माझ्या मागे उभे राहिले नसते. मी कुठलीही भूमिका एकट्याने लढतो. पुरंदरेंचे प्रकरण मी एकट्याने लावून धरले, असे सांगत आव्हाड यांनी पक्षाच्या भूमिकेबाबत आपले मत मांडले.

काय म्हणाले होते रोहित पवार?

आव्हाड यांच्या वक्तव्यावर रोहित पवार यांनी ट्विट करत नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी म्हटले होते की, आज नको त्या विषयावर बोलून वाद ओढवून घेण्यापेक्षा राज्यातील वाढती बेरोजगारी, ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, महिलांची सुरक्षितता, शेतमालाला भाव नसणं, महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये पळवणं, जाती-जातींमध्ये निर्माण केला जाणारा तणाव या ज्वलंत विषयांवर बोलून सरकारला धारेवर धरण्याची अधिक गरज आहे.

देव आणि धर्म हा प्रत्येकाचा व्यक्तिगत विषय असून.. याबाबत प्रत्येकाची श्रद्धा असल्याने कुणीही याचं राजकारण करू नये, पण देवा-धर्माच्या नावावर जे राजकारणाचा बाजार करतात त्यांना ते लखलाभ.. अशा राजकीय व्यापाऱ्यांना जनता चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही.. त्यामुळं देव या विषयावर अनावश्यक बोलून विरोधकांच्या सापळ्यात न अडकण्याचं भान सर्वांनीच ठेवलं पाहिजे, अशी एक नागरिक म्हणून माझी भावना आहे, असे पवारांनी म्हटले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT