Devendra Fadnavis-Sharad Pawar-Sunetra pawar Sarkarnama
महाराष्ट्र

Ncp Merger News : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत CM फडणवीसांचे मोठे विधान; म्हणाले, 'दोघेच सांगू शकतात'

Devendra Fadnavis statement on NCP news : राष्ट्रवादीच्या एकत्र येण्याबाबत पत्रकारासोबतच्या अनौपचारिक गप्पामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे विधान केले आहे.

Sachin Waghmare

Mumbai News : गेल्या काही दिवसापासून राजकीय वर्तुळात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. चार दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली होती. त्यांच्या भेटीनंतर माध्यमात व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस विलिनीकरण चर्चा पुन्हा प्रसार माध्यमात रंगल्या होत्या. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दोन्ही पक्षाच्या विलिनीकरणाबाबत मोठा गौप्यस्फोट केला. यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या असतानाच पत्रकारासोबतच्या अनौपचारिक गप्पामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे विधान केले आहे.

पत्रकारासोबतच्या अनौपचारिक गप्पामध्ये सीएम फडणवीस (devendra fadnavis) म्हणाले, ' राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत फक्त दोनच व्यक्ती सांगू शकतात एक शरद पवार आणि दुसऱ्या सुनेत्रा वहिनी! विलिनीकरण करण्याचे जर ठरवले तर ते आम्हाला सांगतीलच, मात्र अजून तरी आम्हाला याबद्दल काहीही कळवले नाही.'

अजितदादा पवार आणि सुनेत्राताई पवार यांच्या कामाच्या पद्धतीत फरक आहे. सहा महिन्यांपूर्वी त्यांनी जी भूमिका मांडली होती. तीच त्यांनी पुन्हा अधोरेखित केली. विलिनीकरणाविषयी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) सांगू शकतात. पण आमच्याशिवाय राष्ट्रवादीचे विलिनीकरण होणार नाही, असेही यावेळी फडणवीस यांनी स्पष्ट केले.

राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून त्यांना दुष्काळातून सुखरूप बाहेर काढले जाईल. पाण्याचे योग्य नियोजन केले असून सरकारकडून योग्य पातळीवर उपाययोजना सुरू आहेत. इतिहासात पहिल्यांदाच चाऱ्याचे दर निश्चित करण्यात आले आहेत. मोठ्या धरणांमध्ये पाणीसाठा चांगला असून त्यासाठीही योग्य नियोजन केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT