Sharad Pawar Sarkarnama
महाराष्ट्र

NCP Merger : राज्यात पुन्हा भूकंप? अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांनी मागितली शरद पवारांची वेळ; काहीतरी मोठं घडणार?

NCP merger talks latest update News : सिल्व्हर ओकवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. गेल्या काही दिवसापासून राजकीय वर्तुळात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडत आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भेटीची वेळ मागितली असल्याचे पुढे आले आहे. भेटीसाठी बुधवारची वेळ मागितली असल्याची माहिती मिळत आहे. शरद पवार यांच्याकडुन अद्याप वेळ देण्यात आल्याबाबत माहिती समोर आलेली नाही. दुसरीकडे या भेटीसाठी उद्या किती आमदार जाणार याबाबत माहिती मिळू शकली नाही. राजकीय दृष्टया ही महत्त्वाची घडामोड मानली जात असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सिल्व्हर ओकवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. गेल्या काही दिवसापासून राजकीय वर्तुळात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. चार दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली होती. त्या भेटींनंतर पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस विलिनीकरण चर्चा पुन्हा प्रसार माध्यमात रंगल्या होत्या. त्यातच प्रफुल्ल पटेल हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची 10 नोव्हेंबरनंतर भेट घेणार असल्याने चर्चेला उधाण आले असतानाच आता अजित पवार गटाच्या सर्व आमदारांनी शरद पवार यांची भेटीसाठी वेळ मागितली आहे, त्यामुळे विलिनीकरणाच्या चर्चेला आणखी वेग आला आहे.

दरम्यान, मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बारामतीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. त्यांच्यामध्ये 45 मिनिटे चर्चा झाली होती. तर दुसरीकडे पंकज भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी शरद पवार (Sharad pawar) यांची भेट घेतली होती. शरद पवार हे सध्या मुंबईतच असून, प्रकृतीच्या कारणास्तव पुढील काही दिवस ते आपल्या 'सिल्व्हर ओक' या निवासस्थानी आराम करणार असल्याचे पवार कुटुंबीयांकडून सांगण्यात आले आहे.

शरद पवार यांच्याकडुन अद्याप या आमदारांना भेटीसाठी वेळ देण्यात आल्याबाबत माहिती समोर आलेली नाही. दुसरीकडे या भेटीसाठी किती आमदार जाणार याची माहिती मिळू शकली नाही. राजकीय दृष्टया ही महत्त्वाची घडामोड मानली जात असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT