Amol Mitkari  sarkarnama
महाराष्ट्र

Amol Mitkari : 'भगवी टोपी घातलेल्या लाखो लोकांमध्ये अजान होते', व्हिडिओ दाखवत अमोल मिटकरींनी भाजप आमदाराला डिवचले

Amol Mitkari Nitesh Rane : माझी राणेंच्या पुत्रांना विनंती आहे त्याने चार वेद, सहा शास्त्र आणि 18 पुराणं हिंदु धर्मात आहेत त्यांची नावं सांगावीत आणि आपलं हिदुत्व सिद्ध करावं, असे आवाहन अमोल मिटकरींनी दिले होते.

Roshan More

Amol Mitkari News : भाजप आमदार नितेश राणे यांनी प्रक्षोभक भाषण केले होते. मशि‍दीमध्ये घुस के चून चून के मारेंगे, असे वक्तव्य राणे यांनी केले होते. त्यांच्या विरोधात नगरमधील पोलिस ठाण्यात गुन्हा देखील झाला होता.

महायुतीमध्ये असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भगवी टोपी घालून नमाज म्हणणाऱ्या व्यक्तींचा व्हिडिओच ट्विट करत नाव न घेता नितेश राणेंना डिवचले आहे.

अमोल मिटकरी यांनी व्हिडिओ ट्विट करत लिहिले आहे की, "चुन चुन के मारेंगे" म्हणणाऱ्याने हा व्हिडिओ नीट बघावा. दरवर्षी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथीला गुरुकुंज मोझरी (अमरावती) येथे भगवी टोपी घालुन उभ्या असणाऱ्या लाखो लोकांमध्ये आजही अजान होते.खऱ्या संतांची हिच शिकवण आहे.

यावर्षी येऊन बघ

आपल्या ट्विटमध्ये मिटकरी यांनी अप्रत्यक्ष नितेश राणे यांना गुरुकुंज मोझरी होणाऱ्या कार्यक्रमाला येण्याचे निमंत्रण दिले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, जरा यावर्षी येऊन बघ.मानवधर्म काय असतो तो इथे दिसेल.

हिंदुत्व सिद्ध करावे...

अमोल मिटकरी यांनी या आधी देखील नितेश राणे यांच्यावर टीका केली होती. अमोल मिटकरींचा धर्म तपासण्याची वेळी आली आहे, अशी टीका नितेश राणेंनी केली होती. त्यावर माझी राणेंच्या पुत्रांना विनंती आहे त्याने चार वेद, सहा शास्त्र आणि 18 पुराणं हिंदु धर्मात आहेत त्यांची नावं सांगावीत आणि आपलं हिदुत्व सिद्ध करावं, असे आवाहन दिले होते

नितेश राणे काय उत्तर देणार?

नितेश राणे यांचे नाव न घेता मिटकरी यांनी व्हिडिओ ट्विट करत राणेंना टोला लगावला आहे. त्यामुळे आक्रमक वक्तव्य करण्यासाठी प्रसिद्ध असलेले नितेश राणे अमोल मिटकरींच्या टोल्याला कसे उत्तर देतात याची उत्सुकता असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT