उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शरद पवार यांच्या हस्ते महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमात दोन्ही नेत्यांनी एकमेकांचं तोंडभरून कौतुक केलं. दिल्लीतील झालेल्या या कार्यक्रमामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणात वावटळं उठलं आहे. ठाकरेंच्या शिवसेनेला शरद पवार पचलेलं दिसत नाही.
खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एकनाथ शिंदेंना पुरस्कार देण्यावरून थेट जेष्ठ नेते शरद पवारांवर हल्लाबोल केला आहे. या टीकेनंतर थेट पवार कुटुंबातूनच प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झालीये. दिल्लीतील कार्यक्रमावरून संजय राऊत यांच्यासारख्या नेत्याने दिलेली प्रतिक्रिया आश्चर्यकारक आहे, असं मत रोहित पवार यांनी व्यक्त केलं आहे.
सोशल मीडियावर पोस्ट करत, 'दिल्लीतील कार्यक्रमावरून संजय राऊत साहेबांसारख्या मोठ्या राजकीय नेत्याने दिलेली प्रतिक्रिया आश्चर्यकारक आहे. महाराष्ट्राला स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या सुसंस्कृत राजकारणाची परंपरा लाभली असून स्व. बाळासाहेब ठाकरे, आदरणीय पवार साहेब यांच्यासारख्या जेष्ठ नेत्यांनी ही परंपरा पुढे नेली, सामाजिक-सांकृतिक कार्यक्रमांना राजकीय मतभेदाचा कधीही अडसर ठरू दिला नाही तसेच महाराष्ट्राची सामाजिक व सांकृतिक वीण अधिक घट्ट करण्यावर नेहमीच भर दिला.
पण मागील दोन-तीन वर्षात भाजपाने कलुषित केलेले राजकारण, महाराष्ट्राच्या अस्मितेशी केलेली छेडछाड बघता यामुळंच संजय राऊत साहेबांनी तडकाफडकी ही प्रतिक्रिया दिली असावी! , अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे.
एकनाथ शिंदेंना शरद पवारांच्या (Sharad Pawar) हस्ते देण्यात आलेल्या पुरस्कारावर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले, "महाराष्ट्रचं राजकारण फार विचित्र दिशेने चाललं आहे. कोण कोणाला टोप्या घालतंय आणि कोण कोणाच्या टोप्या उडवतंय, कोण कुणाला गुगली टाकतंय आणि कोण हीट विकेट होत आहे. ज्या एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्रातील सरकार पाडलं. बेईमानी केली त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी जायला नको होतं.
ज्यांनी महाराष्ट्राची वाट लावली, ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो, त्यांना अशाप्रकारे सन्मान आपल्या हातून देणं हे महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का लावणारा आहे. ही आमच भावना आहे, कदाचित पवारांची भावना वेगळी असू शकेल. पण हे महाराष्ट्रातील जनतेला पटलेले नाही. कारण शरद पवारांचा आम्ही आदर करतो." अशी भूमिका संजय राऊत यांनी मांडली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.