Nashik News : महायुतीमधील धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली असून याची ठिणगी नाशिकमध्ये पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराने जाहीरपणे मित्रपक्षाच्या नेत्यांबद्दल नाराजी व्यक्त करत आपल्याला काम करत असतानाही त्रास दिला जातोय अशी तक्रार केली आहे. ही तक्रार थेट स्टेजवरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोरच व्यक्त केल्याने आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.
नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज अहिरे यांनी, शिवसेना शिंदे गटाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. अहिरे यांनी याबाबत, शिंदे गटाचे नेते आपल्याला अनेक प्रकारे त्रास देत आहेत. ते मी केलेल्या कामाचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत. तर थेट भगूरमध्ये काम करू नका, अशी अडवणूक केली जातेय अशी खदखद सरोज अहिरे यांनी व्यक्त केलीय. यानंतर अजित पवार यांनी, आपण अहिरे यांच्या पूर्णपणे पाठिशी आहोत. याकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला दिला आहे. पण आता अशा प्रकारे शिंदे सेनेची कुरघोडी सुरू असल्याचे समोर येत आहे. यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संताप पसरला आहे.
आदरणीय अजितदादा आपल्या प्रेमाचा हात लहान बहीण म्हणून कायम डोक्यावर राहू द्या, अशी मी विनंती करतेय. कारण जसे तुम्ही शिस्त आम्हाला लावता तशीच कुठेतरी आपल्या मित्रपक्षाच्या लोकांनाही लावा. असा वाद-विवाद होण्यात काहीच अर्थ नाही. पण प्रश्न आहे तो त्रासाचा. मित्र पक्षातीन नेत्यांच्या त्रासामुळे काम करता येत नाही. याचे साक्षीदार व्यासपीठावरील सर्व लोक आहेत.
लोकांचे प्रश्न सोडवायचे, त्यांची कामे मंजूर करुन आणायचं अन् श्रेय शिंदे सेनेचे नेते परस्पर घेत आहेत. कामे मंजूर करुन आणण्यासाठी पाठपुरावा तीन-तीन वर्षात करायचा आणि इकडे चार-सहा महिन्यांचं पत्र दाखवून श्रेय लाटलं जातंय. हा त्रास गेल्या पाच वर्षातदेखील सहन केल्याची तक्रार सरोज अहिरे यांनी अजित पवार यांच्याकडे केली आहे.
यावरून अजित पवार यांनी, या सगळ्यांवरून दुर्लक्ष करण्याचा सल्ला दिला असून सरोज दुसऱ्यांदा आमदार झाल्या आहात. काम करूनही जर कुणी त्रास देतं असेल नाराजी व्यक्त होतेच. या गोष्टीला फार काही महत्त्व देऊ नकोस. आम्ही तुझ्या पाठिशी मजबुतीने आहोत. तुला कुठलीही गोष्ट कमी पडू देणार नाहीत, अशा शब्दात अजित पवार यांनी ग्वाही सरोज अहिरे यांना दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.