Sharad Pawar Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Politics : माझा राजकीय बाप शरद पवार म्हणणारा नेता विखे पाटलांच्या भेटीला, पक्ष बदलणार?

Amit Bhangare Sharad Pawar : अहिल्यानगर जिल्ह्याचा राजकारणात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. शरद पवार यांचा नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.

Roshan More

Local Body Elections : आगामी स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत अनेक राजकीय गणित बदलताना दिसून येत आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अहिल्यानगरचे युवकचे अध्यक्ष अमित भांगरे यांनी बुधवारी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली. विधानसभा निवडणुकीत अमित भांगरे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार देखील होते. तेंव्हा त्यांनी आम्ही बाप बदलत नाही. माझा राजकीय बाप शरद पवार असल्याचे विधान केले होते.

अमित भांगरे यांनी आपली आई सुनीता भांगरे यांच्यासोबत राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत शिर्डीतील शासकीय विश्रामगृहात भेट घेतली. अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी राखीव झाले आहे.त्यात सुनिता भांगरे या अकोले तालुक्यातून जिल्हा परिषद निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे समजते.

जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी अध्यक्षपद राखीव असल्याने भांगरे-विखे पाटील यांच्या भेटीला वेगळे महत्त्व आले आहे. भाजपच्या माध्यमातून सुनीता भांगरे यांना उमेदवारी मिळू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

अमित भांगरे पक्ष बदलणार?

विधानसभा निवडणुकीला आपला राजकीय बाप शरद पवार आहे, असे सांगणारे अमित भांगरे पक्षांतर करणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. विखे पाटील यांच्यासोबत शिर्डी विश्रातगृहात झालेली भेट ही अमित भांगरे यांनी घेतलेली दुसरी भेट असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे भांगरेंच्या पक्षांतराच्या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे. मात्र, त्यांनी अधिकृतपणे यावर कोणतेही भाष्य केलेले नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT