Mumbai : मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काही दिवसांपूर्वीच कोसळला. त्यानंतर राज्यभरात मोठं राजकारण तापलं. पोलिसांनी दोघांना अटकही केली. पण अजूनही या घटनेचे पडसाद राज्यात उमटत आहेत. आता या घटनेची पुनरावृत्ती बदलापूरमध्येही होऊ शकते, अशी भीती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये घोटाळ्याचा आरोप केला आहे. बदलापूरला मालवणची पुनरावृत्ती? छत्रपती शिवाजी महाराज पुतळा उभारणी प्रकल्पात घोटाळा, असं शीर्षक देत आव्हाडांनी घोटाळ्याचा आरोप केला आहे. तसेच याबाबत माहितीही दिली आहे.
सगळ्यात कमी देकार (L-1) 63 लाख 13 हजार रुपये या राज एंटरप्राइजेस, ज्याचा अनुभव 28 वर्षे असून सुमारे 300 पुतळे उभारले आहेत, या शिल्पकाराला डावलले. आणि काम कोणाला दिले? जादा दराने निविदा भरली आहे, त्या कराहा स्टूडियोला, असा दावा आव्हाडांनी केला आहे.
निविदा रक्कम (L-2) 95 लाख 28 हजार 600 रुपये या शिल्पकाराचे वय आहे सुमारे 28 वर्षे. आणि एकही पुतळा उभारणीचा अनुभव नाही. पुन्हा 32 लाख 15 हजार 600 रुपये जास्त. पैसे कोणाच्या घश्यात?, असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, राजकोट येथील पुतळा उभारणीच्या कामातही घोटाळा झाल्याचा आरोप महाविकास आघाडीतील नेत्यांकडून केला जात आहे. मोठे पुतळे बनवण्याचा अनुभव नसलेल्या शिल्पकाराला काम दिल्याचा आरोपही या नेत्यांकडून केला जात आहे. शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाचे आमदार वैभव नाईक यांनीही आरोप केले आहे. आता त्यांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले आहे. घोटाळ्याचे पुरावे द्यावेत, असे पोलिसांनी त्यांना सांगितले आहे. आता बदलापूरमध्ये उभारण्यात येणाऱ्या पुतळ्याच्या कामातही भ्रष्टाचाराचा आरोप आव्हाडांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.