Sunetra Pawar, Devendra Fadnavis Sarkarnama
महाराष्ट्र

NCP Politics : राष्ट्रवादी काँग्रेसकडे पुन्हा अर्थ खाते? वरिष्ठ नेत्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा

Ministry of Finance Sunil Tatkare Devendra Fadnavis : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी नुकतीच दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतली. त्यामुळे अर्थ खाते हे पु्न्हा राष्ट्रवादीला मिळणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

सरकारनामा ब्यूरो

NCP News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिवंगत नेते व तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्याकडे असलेले अर्थखाते भाजपने स्वत:कडे घेतले आहे. हे खाते परत मिळावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रयत्न सुरू असून या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची चर्चा झाली आहे.

‘‘अर्थखाते राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावे, ही आमची सुरुवातीपासूनची भूमिका आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली असून, गरज भासल्यास पुन्हा चर्चा करू, ’’ असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नुकतीच दिल्ली येथे भेट घेतली. मात्र या भेटीत अर्थखात्याबाबत चर्चा झाल्याबाबत सांगितले जात असले तरी त्यात तथ्य नसल्याचे पक्षाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांनी दिल्लीत अमित शहा यांची नुकतीच भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि नाशिक जिल्ह्यातील मंत्री कुंभमेळ्याचे निमंत्रण देण्यासाठी राष्ट्रपतींच्या भेटीसाठी गेले होते. त्यावेळी शहा यांची भेट झाल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले.

राष्ट्रवादीकडे पुन्हा अर्थखाते…

दिल्लीतील चर्चेबाबत मौन या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, याबाबत पक्षातील नेतेमंडळी बोलण्यास तयार नाहीत. मात्र या भेटीत अर्थखाते राष्ट्रवादी काँग्रेसला परत मिळावे, याबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. आगामी काळात मंत्रिमंडळात बदल झाल्यास हे खाते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळण्याची शक्यता पक्षातील सूत्रांनी वर्तविली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT