Ravindra Waikar  Sarkarnama
महाराष्ट्र

Ravindra Waykar : मविआच्या चार नेत्यांच्या अडचणीत वाढ; ईडीने रवींद्र वायकरांना बोलवले चौकशीला

Political News : ठाकरे गटाच्या तीन जणांच्या तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याची होणार चौकशी

Sachin Waghmare

Mumbai News : केंद्रीय तपास यंत्रणेने गेल्या काही दिवसापासून महाविकास आघाडीतील नेत्याची चौकशी सुरु केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील ठाकरे गटाच्या तीन जणांच्या तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याला येत्या काळात चौकशीसाठी बोलविण्यात आल्याने त्यांच्या अडचणीत भर पडली आहे. रविवारी ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांना ईडीने समन्स पाठवले असून मंगळवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

जोगेश्वरी भूखंड प्रकरणी ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. या प्रकरणात वायकर यांना ईडीने समन्स पाठवले आहे. मंगळवारी एडी कार्यालयात चौकशीसाठी हजार राहण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या काही दिवसापूर्वी ईडीने त्यांच्या निवासस्थानी धाड टाकली होती. तर काही दिवसापूर्वी चौकशीसाठी ईडीने समन्स दिले होते, पण ते त्यावेळी चौकशीसाठी गेले नव्हते. त्यामुळे आता दुसऱ्यांदा ईडीने नोटीस पाठवली आहे. त्यामुळे आता मंगळवारी होणाऱ्या चौकशीसाठी हजर राहणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

दुसरीकडे केंद्रीय तपास यंत्रणेच्या रडारवर पुन्हा ठाकरे सेना आली आहे. युवा सेनेचे सचिव सूरज चव्हाण यांना झालेली अटक त्यानंतर आमदार राजन साळवी यांच्यावर ईडीकडून केलेल्या कारवाईनंतर पुन्हा त्यांच्या समोर कारवाईची टांगती तलवार आहे.

आमदार राजन साळवी (Rajan salvi) यांच्या घरावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापेमारी केल्यानंतर साडे तीन कोटींची बेहिशेबी मालमत्ता जमवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे येत्या काळात ठाकरे गटासाठीचा मार्ग हा खडतर असणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कोरोना काळातील बॉडी बॅग घोटाळ्या प्रकरणी मुंबईच्या माजी महापौर व ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar ) यांच्या अडचणीत वाढ झाली असून त्यांना ही चौकशीसाठी गुरुवारी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना बारामती अ‍ॅग्रो प्रकरणी बुधवारी ईडीने त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

(Edited by Sachin waghmare)

SCROLL FOR NEXT