Ram Shinde Tushar Doshi .jpg Sarkarnama
महाराष्ट्र

Satara SP News: नीलम गोऱ्हेंना दणका, शिवसेनेच्या नाकावर टिच्चून साताऱ्याचे SP तुषार दोशींचं निलंबन रद्द; सभापती राम शिंदेंची घोषणा

Satara SP Tushar Doshi Suspended: विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी या प्रकरणात सातारचे पोलीस अधिक्षक तुषार दोशी यांच्या निलंबनाचे आदेश दिले होते. पण भाजपनं गोऱ्हेंच्या या आदेशावर तीव्र आक्षेप नोंदवला होता.

Deepak Kulkarni

Mumbai News : सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीवेळी भाजप विरुद्ध एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीत यांच्यात जोरदार राडा झाल्याचं पाहायला मिळालं होतं. यावेळी कथित मतचोरी, पोलिसांनी राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांना जिल्हा परिषद इमारतीतूनच अटक करून मतदानापासून वंचित ठेवल्याचा प्रकार आणि मंत्र्यांना झालेली धक्काबुक्कीचे तीव्र पडसाद हे अधिवेशनात उमटले होते.

विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी या प्रकरणात सातारचे पोलीस अधिक्षक तुषार दोशी यांच्या निलंबनाचे आदेश दिले होते. पण भाजपनं गोऱ्हेंच्या या आदेशावर तीव्र आक्षेप नोंदवला होता. यानंतर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कायदेशीर भाषेत तुषार दोशी यांच्या निलंबनाबाबतची भूमिका स्पष्ट केली होती.

यावर फडणवीस यांनी एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या निलंबनाचे अधिकार हे कार्यकारी मंडळ अर्थात मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाला असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे दोशी यांचं निलंबन आदेश रद्द होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत होती. आता याचदरम्यान, सातारा पोलिस अधिक्षक तुषार दोशींच्या निलंबनावर शिवसेना नेते तथा मंत्री आग्रही राहिले असतानाच सभापती राम शिंदेंनी उपसभापती नीलम गोऱ्हेंचे आदेश रद्द केले आहेत.

सभापतींनी राम शिंदे यांनी उपसभापती नीलम गोरे यांचे सातारा पोलिस अधिक्षक तुषार देशी यांच्या निलंबनाचे दिलेले आदेश नियमबाह्य असल्याचं ठपका ठेवत ते रद्द केले आहेत. गोह्रे यांनी दिलेले निलंबनाचे आदेश सभापती राम शिंदे यांनी मागे घेत याप्रकऱणी नव्यानं चौकशीचे आदेश दिले आहेत.

तसेच सभापती राम शिंदेंनी यावेळी उपसभापतींना विधिमंडळ परिसरात असलेल्या घटनेबाबत पीठासीन अधिकाऱ्यांना निर्णय देण्याचा अधिकार असल्याचंही म्हटलं. या निर्णयानंतर शिवसेनेकडून गोंधळ घालण्यास सुरुवात झाल्यानं सभागृहाचं कामकाज तातडीनं तहकूब करण्यात आले.

दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी हे गेल्या 4 दिवसांपासून वैद्यकीय रजेवर गेले असल्याची माहिती समोर आली होती. ते खरंच आजारी असल्यानं वैद्यकीय रजेवर गेले आहेत की राज्य सरकारनं त्यांना निलंबनाऐवजी सक्तीच्या रजेवर पाठवले आहे, याबाबत राजकीय तसेच प्रशासकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT