BJP leader linked to NEET paper leak case: देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणारा NEET पेपर लीक घोटाळा हा भाजपच्या संरक्षणाखाली चालणाऱ्या माफियांचा काळा चेहरा आहे.
भारतीय जनता पार्टीचा नेता दिनेश बिंवाल याने ३० लाख रुपयांत NEET चा पेपर विकत घेतला आणि तो पुढे लाखो रुपयांत विकून विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा बाजार मांडला, अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. बिंवाल याने सोशल मीडियावर पेपर फिरवून लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची थेट हत्या केली, असे वडेट्टीवार यांनी म्हटले.
दोन वर्ष रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना आज पुन्हा परीक्षा द्यावी लागत आहे, पण पेपर विकणारे आणि देशाच्या शिक्षण व्यवस्थेला काळिमा फासणारे लोक मात्र सत्तेच्या संरक्षणाखाली मोकाट फिरत आहेत. ही फक्त पेपरफुटी नाही, तर भाजपच्या काळात उभ्या राहिलेल्या भ्रष्ट व्यवस्थेची घाणेरडी वस्तुस्थिती आहे, असे देखील त्यांनी म्हटले आहे.
२०२४ मध्येही पेपरफुटी झाली, आता पुन्हा तीच घटना घडली. म्हणजे पेपर लीक हा अपघात नाही, तर भाजप राजवटीत चालणारा संघटित व्यवसाय बनला आहे. लाखो कुटुंबांची स्वप्नं उद्ध्वस्त होत असताना भाजप सरकारला ना लाज, ना जबाबदारी, अशी टीका त्यांनी भाजप सरकारवर केली आहे. आज देशातील विद्यार्थी विचारत आहेत, मेहनत करणं चूक आहे का? कारण भाजपच्या राजवटीत गुणवत्ता हरते आणि माफिया जिंकतात, असे देखील त्यांनी म्हटले आहे.
काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी ट्विट करत म्हटले आहे की, NEET सारख्या देशातील महत्त्वाच्या परीक्षेचा पेपर पुन्हा फुटणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. लाखो विद्यार्थ्यांचे वर्षभराचे कष्ट, पालकांची मेहनत आणि विद्यार्थ्यांची स्वप्ने अशा निष्काळजी व चुकीच्या यंत्रणेमुळे धोक्यात येत आहेत.
पारदर्शक आणि सुरक्षित परीक्षा घेणे ही NTA ची मूलभूत जबाबदारी आहे. तीच वारंवार अपयशी ठरत असेल, तर केवळ चौकशी नव्हे तर कठोर आणि ठोस कारवाई होणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी असा खेळ आता थांबायलाच हवा.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.