MLC Election Result Nitesh Karale sarkarnama
महाराष्ट्र

Nagpur Mlc Result : नागपूर पदवीधरमध्ये कराळे मास्तर 'गेम चेंजर', काँग्रेसचे गणित बिघडवले, अभिजीत वंजारी पिछाडीवर

MLC Election Result Live Nitesh Karale: अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढणाऱ्या नितेश कराळे यांनी 24 हजार 249 मते घेतली आहेत. भाजपच्या उमेदवार आघाडीवर आहे. तर, काँग्रेसची धाकधुक वाढली आहे.

Roshan More

Nitesh Karale News : नागपूर पदवीधर मतदारसंघात मोठा ट्विस्ट आला आहे. पहिल्या फेरीत आघाडीवर असलेले काँग्रेसचे अभिजीत वंजारी दुसऱ्या फेरीत पिछाडीवर आहेत. तर, भाजपचे उमदेवार सुधाकर कोहळे 4 हजार 291 मतांनी आघाडीवर आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून निलंबीत केलेले अपक्ष उमेदवार नितेश कराळे हे 'गेम चेंजर' ठरत आहे.

अभिजीत वंजारी हे पिछाटीवर असले तरी कोहळे हे देखील दुसऱ्या फेरीनंतर विजयी मतांचा कोटा पूर्ण करू शकले नाहीत. त्यामुळे आता दुसऱ्या क्रमांच्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरू आहे. दुसऱ्या पसंतीच्या मतांमध्ये कोण आघाडी घेणार याची उत्सुकता आहे.

पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये नितेश कराळे यांनी 24 हजार 249 मते घेतली आहेत. तर, अभिजीत वंजारी अभिजित वंजारी 56 हजार 630, सुधाकर कोहळे 60 यांनी 924 मते घेतली आहेत. ते 4 हजार 294 मतांनी आघाडीवर आहेत.

नागपूर पदवीधर मतदारसंघात विजयाचा कोटा हा 75 हजार 438 आहे. या कोटा कोण पूर्ण करणार याची उत्सुकता आहे. दुपारी 10 नंतर चित्र स्पष्ट होईल, असे सांगण्यात येत आहे. मात्र, कराळे मास्तर यांच्यामुळे काँग्रेसचे गणित बिघडल्याची चर्चा आहे.

निलंबन अन् ओक्साबोक्सी रडले

मतदानच्या अवघ्या एक दिवस आधी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने नितेश कराळे यांना आपल्या पक्षातून निलंबित केले. महाविकास आघाडीच्या उमेदवाराविरोधात बंडखोरी करणे आणि शरद पवारांचा आपल्याा पाठींबा असल्याचा गैरसमज निर्माण करण्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. दरम्यान, निलंबनाची माहिती मिळाल्यानंतर नितेश कराळे हे माध्यमांच्या समोर ओक्सबोक्सी रडले होते. त्यांनी पक्षासाठी काय केले याचा पाढा त्यांनी वाचला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT