<div class="paragraphs"><p> Aryan Khan</p></div>

Aryan Khan

 

Sarkarnama

महाराष्ट्र

आर्यन खान प्रकरणात पुरावे नाहीत, पुढील आदेश मिळेपर्यंत तपास स्थगित

सरकारनामा ब्युरो

मुंबई : आर्यन खान (aryan khan) ड्रग्ज पार्टीतील खंडणीचे पुरावे मिळाले नाहीत. त्यामुळे क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणातील कथित खंडणी प्रकरणाचा तपास पुढील आदेश मिळेपर्यंत स्थगित करण्यात करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी ही माहिती दिली.

''क्रूझवरील ड्रग्जच्या संदर्भात कथित खंडणी प्रकरणाचा तपास पुढील आदेशापर्यंत थांबवण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी तपासासाठी विशेष चौकशी पथक (sit) स्थापन केले होते आणि सुमारे 20 लोकांची चौकशी केली होती. अद्याप कोणताही पुरावा न मिळाल्याने या प्रकरणाचा तपास पुढील आदेश मिळेपर्यंत स्थगित करण्यात करण्यात आला आहे,'' असे मुंबई पोलिसांनी सांगितलं.

या प्रकरणात अभिनेता शाहरुख खानकडून २५ कोटी रुपयांची मागणीबाबतचे संभाषण समोर आले होते. त्यानंतर मुंबई पोलिसांनी खंडणी प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथक स्थापन केले. त्यानंतर शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी यांनी केपी गोसावी, सॅम डिसूजा यांची या रकमेबाबत भेट घेतली होती, मात्र या चैाकशीनंतर तपास पुढे गेला नाही.

''हे पथक काही कागदपत्रांच्या प्रतीक्षेत आहे. याबाबत कोणताही तपास अहवाल सादर झालेला नाही, येथे एनसीबी (ncb) ने खंडणीच्या आरोपांची चैाकशी करण्यासाठी एक टीम देखील तयार केली आहे, असे सुत्रांनी सांगितले. एनसीबीच्या मुंबई विभागाचे प्रमुख समीर वानखेडे यांचा कार्यकाळ ३१ डिसेंबर रोजी संपणार आहे. त्यांनी मुदतवाढीची मागणी केलेली नाही. हे प्रकरण एनसीबीकडून एसआय़टीकडे हस्तांतरित केले आहे. आर्यन खानला दर शुक्रवारी कार्यालयात नियमित हजेरी घेण्यापासून सूट देण्यात आली आहे.

मुदतवाढीबाबत मुख्य कार्यालयातूनही समीर वानखेडे यांना काहीही सांगण्यात आलेले नाही. वानखेडे यांना ऑगस्टमध्ये 4 महिन्यांची मुदतवाढ मिळाली होती. आता त्यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे वानखेडे हे एनसीबीचा कार्यकाळ संपल्यानंतर दीर्घ रजेवर जाणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT