Shelar-Thackeray-Raut Sarkarnama
महाराष्ट्र

आता केजरीवालांचा शिवसेना भवनात सत्कार करतील, युवराज हत्तीवरून साखर वाटतील..

शेजाऱ्यांच्या घरात पाळणा हलला की, पेढे वाटपाचे कार्यक्रम करुन दाखवले जातात..`आपले नाही धड अन शेजाऱ्याचा कढ`. (Bjp Mla Ashish Shealr)

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्याच्या सत्तेत असलेल्या शिवसेना व त्यांच्या नेत्यांनी पाच राज्यातील निवडणुकीच्या प्रचार सभामंधून भाजपला आव्हान दिले होते. (Ashish Shelar) गोवा, उत्तर प्रदेश आणि मनिपूरमध्ये शिवसेना व राष्ट्रवादीने उमेदवार देखील उभे केले. मात्र त्यांची पुरती नाचक्की झाली, निवडणुकींचे निकाल जसजसे हाती येत आहेत, तशा आता भाजपच्या राज्यातील नेत्यांच्या शिवसेनेला सुनावणाऱ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.(Shivsena)

भाजपचे नेते आशिष शेलार यांनी या निमित्ताने शिवसेनेवर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. शेलार यांनी ट्विट करत शिवसेनेच्या २०२४ मध्ये दिल्लीच्या सत्तेत बसणार या दाव्याची खिल्ली उडवली आहे. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत, (Sanjay Raut) गोवा आणि उत्तर प्रदेशात प्रचारसभा घेणारे राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावरही शेलार यांनी निशाणा साधला आहे.

`इसवीसन 2024 साली दिल्लीच्या खुर्चीत बसणार..उत्तर प्रदेश, गोव्यात बघा आम्ही करुन दाखवतो.. उत्तर प्रदेशात युवराजांची अती विराट सभा..झंझावाती दौरा.. या दाव्याची आठवण करून देत सगळ्या बुडबुड्यांचे निकाल लागले...अती प्रचंड मतांनी झंझावाती डिपॉझिट गुल, हारले.. म्हणत शेलार यांनी शिवसेनेला डिवचले आहे.

`एक मासो आणि खंडी भर रस्सो`, असा टोला लगावत शिवसेनेकडून आता अरविंद केजरीवालांचा बहुतेक शिवसेना भवनात जंगी सत्कार होईल. शिवाजी पार्कमध्ये हत्तीवरून युवराज साखर सुध्दा वाटतील..शेजाऱ्यांच्या घरात पाळणा हलला की, पेढे वाटपाचे कार्यक्रम करुन दाखवले जातात..`आपले नाही धड अन शेजाऱ्याचा कढ`, अशा शब्दात शेलार यांनी शिवसेनेचे दावे आणि निवडुकीतील प्रत्यक्ष सुमार कामगिरी याचे विश्लेषण केले आहे.

पाच राज्यातील मतमोजणीला जेव्हा सुरूवात झाली होती, तेव्हा संजय राऊत यांनी हे पोस्टल मतदान आहे, दुपारी दोन वाजेनंतर बघा, काय चित्र होईल ते, अशी प्रतिक्रिया दिली होती. उत्तर प्रेदशात भाजपची सत्ता येणार हे स्पष्ट होत असतांनाही राऊत यांनी अखिलेश यादव यांनी योगींना चांगली टक्कर दिली, अशी प्रतिक्रिया दिली होती.

राज्याबाहेर निवडणूक लढवून देशाच्या राजकारणात आपण उडी घेत आहोत, असा दावा करणाऱ्या शिवसेनेची कामगिरी गेल्या निवडणुकीपेक्षाही सुमार झाल्याचे समोर आल्यामुळे शेलार यांनी शिवसेनेला ट्विट करत चांगलेच डिवचले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT