Uddhav thackeray, Omraje Nimbalkar  Sarkarnama
महाराष्ट्र

Om Rajenimbalkar : ठाकरेंची साथ सोडणाऱ्या ओमराजेंची एक पोस्ट अन् लोक तुटून पडले; गद्दाराची शिक्का..लक्षात ठेव...

Om Rajenimbalkar Defection Shiv Sena UBT : उद्धव ठाकरेंची साथ सोडणाऱ्या ओम राजेनिंबाळकरांवर सोशल मीडियात जोरदार टीका करण्यात येत आहे.

Jagdish Pansare

Shivsena UBT: मी कुठेही जाणार नाही, मी उद्धव ठाकरेंसोबतच राहणार असे सांगत आणाभाका घेणारे धाराशीवचे खासदार ओम राजेनिंबाळकर अखेर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाणार हे निश्चित झाले आहे. शिंदे यांनी सोय केलेल्या विशेष विमानातून ओमराजे पुण्यातून दिल्लीत दाखल झाले. इकडे 'आमचा ओमदादा असा नाही' म्हणणाऱ्यांच्या विश्वासाला तडा गेला अन् राजेनिंबाळकर यांच्या सोशल मीडिया पेजवरच शिवसैनिकांच्या संतापाचा कडेलोट झाला.

ओम राजेनिंबाळकर हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहेत. कार्यकर्त्याचा वाढदिवस असो, महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी असो की मग संकटात सर्वसामान्यांच्या मदतीला जाऊन जाणारा व्हिडिओ, फोटो असो राजेनिंबाळकर तो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट करतात. त्यांना फाॅलो करणारा वर्गही मोठा आहे. त्यामुळे सहाजिकच त्यांच्या दिल्लीत दाखल झाल्याच्या बातम्यानंतर पेजवर कमेंटचा अक्षरश: पाऊस पडला आहे. दोन टर्म खासदार आणि सर्वाधिक मताधिक्याने निवडून देत धाराशीवच्या जनतेने राजेनिंबाळकर यांना डोक्यावर घेतले. पण अखेर त्यांनी गद्दारी केलीच, अशा भावना अनेकजण व्यक्त करताना दिसत आहेत.

ओम राजेनिंबाळकर यांनी राजमाता जिजाऊ यांना पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन करणारी पोस्ट केली. या खाली लोकांनी ज्या कमेंट केल्या आहे, त्या राजेनिंबाळकर यांच्या उद्धव ठाकरे यांची साथ सोडून जाण्याच्या निर्णयावर लोकांमध्ये किती संताप आहे, हे दर्शवते.

अशा आहेत कमेंट..

- या अशा गद्दारांना राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला हात सुद्धा लावू दिला नाही पाहिजे.असेच यांच्या सारखे गद्दार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात सुद्धा होते.

- साहेब तुम्ही आजपासून गद्दार झाले..

- शेवटी गद्दारीचा डाग लावून घेतलाच गद्दार, नावातील राजे नाव काडून टाक शोभत नाही गद्दारा तूला राजे नाव

- चुकलात साहेब तुम्ही पण तेच केले शेवटी जे आज पर्यंत गद्दार करत आले असो तुम्हाला पैसा कमी पडला असेल म्हणून तुम्ही गेले

- गद्दारा तुला छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शंभूराजे आणि राजमाता जिजाऊ आईसाहेब यांच्यापुढे नतमस्तक सुद्धा होण्याचा अधिकार राहिला नाही. आरे उद्या जर तुम्ही ज्यांच्यासाठी गद्दारी केली आहे त्यांनी जर मोघलांना बाप मानलं तर तू सुद्धा बाप मानशील धिक्कार आहे तुझा.

- आज पासून कुणावर विश्वास राहिला नाई

- लोकांची कामं होत नसतील, जनतेच्या अडचणी सुटत नसतील, तर फक्त बघ्याची भूमिका घेऊन बसण्यात अर्थ नाही. लोकांच्या हितासाठी ठाम निर्णय घेणं गरजेचं असतं. दादा, तुम्ही जिथे जाल तिथे लोकांचा पाठिंबा तुमच्या पाठीशी राहील. कारण लोकांचा विश्वास व्यक्तीवर असतो, फक्त पक्षावर नाही. जनतेसाठी काम करणारा नेता लोकांच्या मनात कायम राहतो. ओन्ली दादा!

- आम्ही लई चांगला समजत होतो... लई साळसूद पणा चा आव आणला... महा गद्दार निघाले

- गद्दारा शेवटी गद्दार असतो पण तुम्ही गद्दारी कर चाल असं वाटलं नव्हतं म्हणूनच आम्ही लोकसभेला जिवाच रान करून तुमचं काम केलं

- माझे निवडणुकीचे मत....... तुम्हाला कायमचा.... राम राम

- आतापर्यंत आपल्याला केवळ सहानुभूती म्हणून लोकांनी डोक्यावर घेतले. पण शेवटी आपणही गद्दारच निघालात.

- ओमा ..आम्ही लई विश्वास ठेवला होता तुझ्यावर ... उद्धव ठाकरे साहेबांना व जिल्ह्यातल्या आमच्यासारख्या कट्टर शिवसैनिकांना तू धोका दिला तर आम्ही.. तुझा विरोधक मल्हार पाटलाच्या मागं उभ राहून तुझं राजकारण कायमच संपवू ... Remember this ... खूप झालं आता.

- ओमराजे गद्दारी करू नका, ठाकरेसोबत तुम्ही मोठे होणार आहात, भविष्यात मराठवाड्यातून गोपीनाथ मुंडे साहेबांसारखं नेता होऊ शकतात तुम्ही, निष्ठा ठेवा..

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT