Omicron

 
Sarkarnama
महाराष्ट्र

महाराष्ट्राला ओमिक्रॉनचा विळखा : जुन्नरमधील रुग्णसंख्येने प्रशासन गॅसवर

१६ नागरिक दुबईला (Dubai) पर्यटनासाठी गेले होते.

सरकारनामा ब्युरो

पुणे : महाराष्ट्राभोवती ओमिक्रॉनचा (Omicron) विळखा घट्ट झाला असून रुग्णसंख्या ५० च्या पार गेली आहे. मात्र यात एकट्या पुणे (Pune) जिल्ह्यातील जुन्नर (Junnar) तालुक्यातील रुग्णसंख्येने प्रशासन टेन्शनमध्ये आले आहे. दोन दिवसांपुर्वीच जुन्नर तालुक्यातील वारूळवाडी आणि नारायणगावमधील एकूण ७ जणांना ओमिक्रॉनची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर तालुक्यात खळबळ उडाली होती. त्यानंतर आता आणखी ३ जणांना ओमिक्रॉनची लागण झाल्याचे समोर आले आहे.

त्यामुळे महाराष्ट्रात (Maharashtra) ५४ तर केवळ जुन्नरमध्ये १० रुग्ण अशी परिस्थिती झाली आहे. काही दिवसांपुर्वी नारायणगाव, वारुळवाडी या गावातील १६ नागरिक दुबईला (Dubai) पर्यटनासाठी गेले होते. तेथून ते परत आल्यानंतर १२ डिसेंबरला सर्वांचे RTPCR नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. १७ डिसेंबर रोजी राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेच्या (NIV) अहवालानुसार हे सर्व जण ओमिक्रॉन बाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. विषेश गोष्ट म्हणजे या सर्वांचे लसीकरणही झाले होते. या सर्व रुग्णांना नारायणगाव ग्रामीण रुग्णालयात विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

याच १६ पर्यटकांच्या संपर्कातील नातेवाईक व इतरांची RTPCR तपासणी करण्यात आली होती. त्यातून आता या दुबई वारीवरुन परतलेल्या ७ रुग्णांच्या संपर्कातील आणखी ३ रूग्णांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे नारायणगाव आणि वारुळवाडी ओमायक्रॉनचा हॉटस्पॉट ठरत असल्याची भिती व्यक्त होऊ लागली आहे. जुन्नर तालुक्यातील आधीचे ७ व नवे ३ अशी ओमिक्रॉन बाधितांची एकूण रुग्णसंख्या १० वर पोहचली आहे. दरम्यान या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून घाबरण्याचे कारण नसल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT