Maharashtra politics : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले लोकसभेचे सहा खासदार सुमारे दीड महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत विलीन झाले. या सहा खासदारांपैकी सर्वाधिक चर्चा झाली ती धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या पक्षप्रवेशाची. शिवसेनेत फूट पडल्यानंतर ओमराजेंनी निष्ठेच्या अनेक आणाभाका घेतल्या होत्या. त्यामुळे ते ठाकरेंना सोडणार नाही, अशी सुरूवातीला चर्चा होती. पण विकासाच्या नावाखाली त्यांनी ठाकरेंची साथ सोडली.
ओमराजे शिंदेकडे गेल्यानंतर त्यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) आणि फेसबुकवरील कव्हर फोटो काढून टाकला. या फोटोमध्ये उद्धव ठाकरेंसोबत आमदार कैलास पाटील हेही होते. या फोटोमध्ये ठाकरेंकडून दोघांच्याही खांद्यावर हात ठेवल्याचे दिसत होते. ओमराजेंसह कैलास पाटील यांच्यावरील ठाकरेंचा विश्वास या फोटोतून झळकत होता. हा फोटो कदाचित एका प्रचारसभेतील असावा.
ऑपरेशन टायगरअंतर्गत ओमराजे एकनाथ शिंदेकडे गेले अन् ओमराजेंनी हा खास फोटो हटविला. या पक्षांतराला जवळपास दीड महिना झाला आहे. पण ओमराजेंना आपल्या सोशल मीडियातील कव्हरसाठी एकही साजेसा फोटो सापडलेला नाही. खरंतर सध्या राजकीय नेते सोशल मीडियात अधिक सक्रीय असतात. कव्हर फोटो, प्रोफाईल फोटोसह बायोमधील माहिती अधिक समर्पक असावी, यासाठी त्यांचा आग्रह असतो.
कोणतीही घटना, घडामोड घडली, नेत्यांच्या गाठीभेटी झाल्या की त्याचे फोटो सोशल मिडियात टाकले जातात. काही खास क्षणांचे फोटो कव्हर किंवा प्रोफाईलमध्ये लावले जातात. पण ओमराजेंना मागील दीड महिन्यांपासून असा एकही फोटो सापडलेला दिसत नाही. त्यांचे एक्स तसेच फेसबुकवर अद्यापही कव्हर फोटो ठेवलेला नाही.
ओमराजे हे त्यांच्या पक्षाचे नेते एकनाथ शिंदे यांना अनेकदा भेटले आहेत. त्यांच्या भेटीचे फोटोही अनेकदा पोस्ट केले आहेत. खासदार श्रीकांत शिंदेंसह इतर सहकारी खासदार, धाराशिवमधील नागरिकांशी संवाद, पाहणी दौरे, पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी आदी प्रसंग मागील दीड महिन्यांत अनेकदा घडले आहेत. पण त्यातील एकही फोटो ओमराजेंना कव्हरला ठेवावासा का वाटला नाही, याबाबत आता चर्चांना उधाण आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.