Uddhav Thackeray, Omprakash Rajenimbalkar Sarkarnama
महाराष्ट्र

Omprakash RajeNimbalkar news : ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या बंडाचे मतदारसंघात जोरदार पडसाद; नगरसेवकांनी उचललं मोठं पाऊल...

Shiv Sena UBT News, Eknath Shinde News : सोशल मीडियात ओमराजे ट्रोल होत आहेत. त्यांच्याविरोधात अनेकांनी सोशल मीडियात पोस्ट केली आहे. खासदार संजय राऊत यांनी तर गभीर दावा केला आहे.

Rajanand More

Maharashtra Politics : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सहा खासदारांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. या सहा खासदारांमध्ये धाराशिवचे ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचाही समावेश आहे. शिवसेनेत २०२२ मध्ये फूट पडली त्यावेळी ओम राजे खंबीरपणे ठाकरेंच्या मागे उभे राहिले होते. आता मात्र त्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतल्याचे दिसते. याचे पडसाद त्यांच्या मतदारसंघातही उमटू लागले आहे.

कुणीही फुटले तरी ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे ठाकरेंशी एकनिष्ठ राहतील, असे धाराशिवमधील सेनेचे कार्यकर्ते ठामपणे सांगत होते. खुद्द राजेनिंबाळकर यांनीही अनेकदा २०२२ च्या फुटीनंतर ठाकरेंची साथ सोडणार नसल्याचे स्पष्ट केले होते. पण त्यांनी अचानक घेतलेल्या भूमिकेमुळे उलटसुलट चर्चा रंगू लागल्या आहेत.

'साम'ने दिलेल्या वृत्तानुसार, राजेनिंबाळकर हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर धाराशिवमधील ठाकरेंच्या पक्षाच्या पाच नगरसेवकांची बैठक झाली. या बैठकीत राजेनिंबाळकर यांच्यासोबत राहण्याचे ठरविण्यात आले. याबाबत माहिती देताना एका नगरसेवकाने सामशी बोलताना सांगितले की, लोकहितासाठी कुठलाही निर्णय घेतला तर चांगलोच असतो. शेवटी राजकारण हे लोकांच्या कल्याणासाठीच असते. त्यामुळे घेतलेला निर्णय योग्यच आहे. सत्तेत नसल्याने आम्हाला न्याय मिळत नाही. कामे वेळेवर होत नाहीत.

शिवसैनिक आक्रमक

ओमराजे यांच्या भूमिकेनंतर कार्यकर्त्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण असल्याचे दिसते. तर काही कार्यकर्ते मात्र चांगलेच आक्रमक झाले आहेत. ओमराजे शिंदे गटात जात असतील तर ते वेदनादायी आहे. ओमराजे आमच्यासाठी भावासारखे आहेत. त्यांना शिवसेनेने सर्वकाही दिले. एवढे करूनही ते असे करत असतील तर निषेधार्ह आहे, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.

दरम्यान, सोशल मीडियात ओमराजे ट्रोल होत आहेत. त्यांच्याविरोधात अनेकांनी सोशल मीडियात पोस्ट केली आहे. खासदार संजय राऊत यांनी तर गभीर दावा केला आहे. ओमराजे यांच्या वडिलांच्या हत्येच्या केसचा निकाल त्यांच्याबाजूने देण्याची ऑफर ओमराजेंना दिल्याचा दावा राऊतांनी केला आहे. काल या प्रकरणाचा मुंबईतील कोर्टाकडून निकाल दिला जाणार होता. पण निकालाची तारीख अचानक पुढे ढकलण्यात आली. त्यावर राऊतांनी हा दावा केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT