CM Shinde, Rahul Narwekar, Uddhav Thackeray Sarkarnama
महाराष्ट्र

Shivsena MLA Disqualification: खरी शिवसेना कुणाची हे ठरवण्याचा अधिकार फक्त मलाच : राहुल नार्वेकर यांचे मोठे विधान

Political News : शिवसेनेच्या अपात्रतेशी संबंधित याचिकेवरील सुनावणीनंतर हा निकाल देताना केले स्पष्ट

Sachin Waghmare

Shiv Sena MLA Disqualification: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेन्सच्या दोन्ही गटांची सुनावणी घेतली. त्याबाबत कायदेतज्ज्ञांसोबत त्यांची चर्चा झाली. त्यानंतर शिवसेनेच्या अपात्रतेशी संबंधित याचिकेवरील सुनावणीनंतर हा निकाल देताना खरी शिवसेना कुणाची हे ठरवण्याचा अधिकार फक्त मलाच असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेत 23 जानेवारी 2018 रोजी अंतर्गत निवडणूक झाली नाही, असे निरीक्षण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नोंदवले. 21 जून 2022 रोजी शिवसेनेत दोन गट पडले. शिवसेनेत दोन गट पडल्याचं 22 जून रोजी लक्षात आलं. नेतृत्त्वाची रचना तपासण्यापुरताच पक्षघटनेचा आधार असून खरी शिवसेना कुणाची हे ठरवण्याचा अधिकार फक्त मलाच आहे, असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल देताना स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ठाकरे गटाच्या दाव्यांवर नार्वेकरांकडून सवाल उपस्थित

उद्धव ठाकरे (uddhav thackrey) गटाकडून याचिकेत केल्या गेलेल्या दाव्यांवर नार्वेकरांकडून सवाल उपस्थित करण्यात आले. तर त्याला उत्तर देताना शिंदे गटाकडून सादर केलेली उत्तरे आणि पुराव्यांशी सहमत असल्याचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी यांनी निकालावेळी स्पष्ट केले.

निकालावेळी त्यांनी शिवसेना (Shivsena) नेतृत्त्वावरील दाव्यांबाबत निवडणूक आयोगाने दिलेला निकाल स्पष्ट आहे, पक्षात बंडखोरी झाल्यानंतर खरा पक्ष कोणाचा हा मुद्दाही विचारात घेणं महत्त्वाचं होते, असं विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी म्हटलं आहे.

(Edited by Sachin Waghmare)

SCROLL FOR NEXT