Eknath Shinde-Aditya Thackeray sarkarnama
महाराष्ट्र

Operation Tiger 3 : उद्धव ठाकरेंचे आमदार फुटणार ? आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'ऑपरेशन टायगरआधी ....'

Aditya thackeray statement News : आदित्य ठाकरेंनी ऑपरेशन टायगरवरून एकनाथ शिंदे यांच्या सेनेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

Sachin Waghmare

Mumbai News : राज्यात गेल्या काही दिवसापासून वेगवान घडामोडी घडत आहेत. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची जोरदार चर्चा सुरु असल्याने सर्वांचे लक्ष त्याकडे लागले आहे. त्यातच आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील सहा खासदार फोडल्यानंतर आता पुन्हा एकदा आमदार फोडणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यातच मंत्री उदय सामंत यांनी ऑपरेशन टायगर ३ बाबत मोठे वक्तव्य केले असतानाच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना मोठा झटका देण्याच्या तयारीत आहेत का ? अशी चर्चा सुरु झाली आहे. या ‘ऑपरेशन टायगर’वर माजी मंत्री आदित्य ठाकरेंनी पाहिलीच प्रतिक्रिया दिली. 'ऑपरेशन टायगरआधी महाराष्ट्राचे हाल बघा,' अशा शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त करीत सुरु असलेल्या चर्चेतील हवाच काढली आहे.

दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे (Eknath shinde) एक पोस्टर व्हायरल झाले आहे. त्यामध्ये राज्यात पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर राबवले जाणार असल्याची चर्चा आहे. त्यातून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा धक्का देण्याची तयारी असल्याची बोलले जात होते. तर दुसरीकडे ऑपरेशन टायगर राबवले जाणार की नाही याची चर्चा सुरू असताना मंत्री उदय सामंत यांनी ऑपरेशन टायगर अ‍ॅक्टिव्ह असल्याची कबुली दिली. त्यामुळे या चर्चांना वेग आला असतानाच यावर प्रतिक्रिया देत आदित्य ठाकरे यांनी हवाच काढली आहे.

आदित्य ठाकरेंनी ऑपरेशन टायगरवरून एकनाथ शिंदे यांच्या सेनेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 'अरे बाबांनो सगळं करा, ऑपरेशन टायगर करा. पण महाराष्ट्राची ते हाल करून ठेवलेत, जे उद्योगधंदे तिथून जात आहेत. नाशिकचे रस्ते बघा. याच्यावर कोण काय बोलतोय, काय बघा. फक्त राजकारण राजकारण सुरू आहे. भाजपशासित ज्या महानगरपालिका आहेत. प्रत्येक खासगीकरणीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे. हॉस्पिटल खासगी करतील. एक दिवस सर्वकाही अदानी यांच्या नावावर करतील’, असे आदित्य ठाकरे (Aditya thackeray) म्हणाले,

‘जे तिकडे गेले, महाराष्ट्राची ज्यांनी गद्दारी केली. त्याचे एकच कारण असून पैसा आणि सत्ता भाजप आणि गळचेपी केल्यानंतर, त्यांना कुठेतरी वाटतंय की, आपण नाव गमवतोय. आता ते मार्ग शोधायचा प्रयत्न करतायेत. उद्धव साहेबांपर्यंत येण्याचा प्रयत्न करताहेत. या लोकांनी एका घाणेरड्या स्तरापर्यंत राजकारण नेले आहे. यांनी महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलाय.', अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

दुष्काळामुळे शेतकरी त्रस्त आहे. राज्यात पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मराठवड्यात पंधरा दिवसांत पाणी येते. ती परिस्थिती मुंबईही होणार आहे. प्रदूषण वाढतंय. ‘गोकुळ’बद्दल बोललोच आहे, मत चोरी अजून काय… जगातील मोठा पक्ष आणि त्याला वाटतं की, मागून यावं आणि पुढे जावं, असं वाटतं. आता मला वाटतं की, उद्या ते एक नवीन कायदा आणतायत, शाळेच्या वर्गातील जे क्लास मॉनिटर आहेत, ते पण असेच वरतून येतील’, अशा शब्दात त्यांनी महायुती सरकारच्या कारभारावर टीका केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT