Operation Tiger : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील सहा खासदार फुटल्याची आज दिवसभर चर्चा होती. या खासदारांनी लोकसभाध्यक्षांना भेटून आपला नवीन गट स्थापन करण्याचे पत्र देखील दिल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता या सगळ्यामध्ये मोठा ट्विस्ट आला आहे. फुटलेल्या सहा खासदारांपैकी दोन खासदारांनी आपण पत्रावर सही केली नसल्याचा दावा केला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, मुंबईतील खासदार संजय दिना पाटील आणि धाराशिवचे खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी पत्रावर सह्या केल्या नाहीत. त्यामुळे ऑपरेशन टायगर पूर्ण होऊ शकले नाहीत. स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी सहा खासदारांच्या सह्या आवश्यक होत्या.
उद्धव ठाकरेंचे सहा खासदार एकनाथ शिंदेंसोबत नाहीत, असा विश्वास ठाकरेंच्या शिवसेनेला आहे.त्यामुळे उद्या संसदीय पक्षाची बैठक बोलावली आहे. उद्या नेमके किती खासदार हजर राहतात यावर ऑपरेशन टायगर यशस्वी झाले की नाही हे ठरणार आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून फुटलेल्या खासदारांवर टीका करू नका, अशा सूचना आपल्या पदाधिकारी, नेत्यांना दिल्या आहेत. दरम्यान, संजय दिना पाटील आणि ओम राजेनिंबाळकर यांच्यासोबत पक्षाचा संपर्का झाल्याची माहिती आहे.
एकीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून दोन खासदारांनी स्वाक्षरी केल्या नसल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. तर, शिंदेंच्या शिवसेनेकडून मात्र ऑपरेशन टायगर यशस्वी झाले असून दोन दिवसानंतर खासदारांनी स्वाक्षरी केलेले पत्र पुढे आणले जाईल, असे सांगितले जात आहे. या प्रक्रियेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून अडथळा आणला जाऊ नये,यासाठी दोन दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर माहिती समोर आणली जाईल,असा दावा देखील शिंदेंच्या शिवसेनेकडून करण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.