Pankaja Munde-dhananjay munde
Pankaja Munde-dhananjay munde Sarkarnama
महाराष्ट्र

धनंजय मुंडेंनी मंत्रीपद भाड्याने देऊन टाकलंय : पंकजांचा नाव न घेता हल्लाबोल

सरकारनामा ब्यूरो

बीड ः गेली दोन वर्षांपासून पीकविमा मिळत नाही. राज्य सरकाकडून मदतीचे पैसे आले का.. पालकमंत्र्यांचे काही पैसे आले की.. असा प्रश्न पंकजा मुंडे यांनी विचारताच उपस्थितांमधून नाही नाही, असा आवाज येतो. त्यावर पंकजा म्हणाल्या, त्यांच्याकडून काही मदत मिळाली नाही, असं म्हटलं की त्यांना राग येतो. तुम्ही मंत्री झाल्यावर आम्ही कोणाला विचारणार ना. सध्या मीच दिलेल्या निधीतून कामे सुरू आहेत. पण त्यांचं चालू आहे ना....आपलं मंत्रीपद त्यांनी भाड्याने देऊन टाकलं आहे, अशी घाणाघाती टीका माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्याच्या भाषणातून बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर केला. (Pankaja Munde criticizes Dhananjay Munde at Dussehra melava)

दसऱ्याच्या निमित्ताने परंपरेप्रमाणे आयेाजित केलेल्या मेळाव्यात भाजप नेत्या पंकजा मुंडे बोलत होत्या. खासदार प्रीतम मुंडे, खासदार सुजय विखे पाटील, आमदार महादेव जानकर, आमदार सुरेश धस, आमदार नमिता मुंदडा यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. पंकजा म्हणाल्या की, दसरा मेळाव्याच्या आधी पॅकेज जाहीर करण्याची आम्ही मागणी केली होती. ते सरकारने जाहीर केले आहे. आता ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला पाहिजे. पण सरकारने जाहीर केलेले हे पॅकेज पुरेसे नाही. त्यात वाढ करून गोरगरीब शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी, अशी मागणीही त्यांनी केली. लवकरच मी राज्याचा दौरा करणार आहे.

गेली दोन वर्षांपासून पीकविम्याचे पैसे मिळत नाही. राज्या सरकारची मदत मिळत नाही. मोदींचे मात्र दोन हजार रुपये येत आहेत, असे सांगून त्यांनी उपस्थितांना राज्य सरकारचे काही पैसे आले. पालकमंत्र्यांचे काही पैसे आले का, असे प्रश्न विचारले. उपस्थितांमधून नाही नाही, असे उत्तर आले. शेतकऱ्यांना न मिळणाऱ्या मदतीवरून त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर नाव न घेता हल्लोबाल केला. त्या पुढे म्हणाल्या की, त्यांच्याकडून काही मदत मिळाली नाही, असं म्हटलं की ह्यांना राग येतो. तुम्ही मंत्री झाल्यावर आम्ही कोणाला विचारणार. आम्ही विरोधी पक्षात असल्याने आम्ही सरकारलाच मागणार ना. तुम्ही जेव्हा विरोधी पक्षनेते होता, तेव्हा लोकांना किती त्रास द्यायचे. नुसत्या धमक्या, असं करेन आणि तसं करेन. आता राज्यातील शेतकऱ्यांची काय अवस्था आहे. आहे का रुपयाची तरी मदत. सध्या मीच दिलेल्या निधीतून कामे सुरू आहेत. आपलं मंत्रीपद त्यांनी भाड्याने देऊन टाकलं आहे. ह्यांचं कोणाचही सध्या चालत नाही. तुम्ही चांगलं आणि जनतेच्या हिताचे काम करा. आम्ही तुमचं जाहीरपणे अभिनंदन करू,असेही त्या धनंजय मुंडे यांना म्हणाल्या

वेळ आली तर तुमच्यावरून जीवसुद्धा ओवाळून टाकेन. मला तुमच्याशिवाय कोणी नाही, त्यामुळे मी तुमच्यावर जीव ओवाळून टाकेन. सामान्य माणूस या मेळाव्या माध्यमातून उर्जा घेऊन जाते. मी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भाषण पाहत होते. त्यात मोहन भागवत म्हणते होते की समाजात भेदभाव नसला पाहिजे. तेच काम गोपीनाथ मुंडे करत होते. काहीजण म्हणत होते, सत्ता नसल्याने मेळावा नको. अतिवृष्टी, कोरोना या परिस्थितीमुळे माणूस खचलेला आहे. पण, या खचलेल्या माणूसला ऊर्जा देण्यासाठी मेळाव्याची गरज असते,असे त्यांनी मेळाव्यात बोलताना स्पष्ट केले.

आपली मान खाली जाईल, अशा व्यक्तीचा, प्रवृत्तीचा मला उल्लेख येथे करायचा नाही. कोरोना होता, त्यामुळे माझा दौरा नव्हता. लोक आरोग्याशी झुंजत असताना मेळावे, दौरे कसे करणार. पण आम्ही कोविड सेंटर काढून लोकांना मदत केली. ज्यांना गरज आहे, त्यांना बेड, औषधे उपलब्ध करून दिले,याचाही उल्लेख त्यांनी भाषणात केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT