Dhananjay Munde, Pankaja Munde  Sarkarnama
महाराष्ट्र

Dhananjay Munde : दसऱ्या मेळाव्याला मुंडे बहीण-भाऊ पहिल्यांदाच एकत्र, बीडच्या राजकारणाची दिशा स्पष्ट होणार?

Roshan More

Dhananjay Munde News : दरवर्षी पंकजा मुंडे यांच्याकडून भक्तीगडावर सावरगाव घाट येथे दसरा मेळावा आयोजित केला जातो. यंदा 12 ऑक्टोबरला होणाऱ्या या मेळाव्याला प्रथमच धनंजय मुंडे उपस्थित राहणार आहेत. विचारांचे सोने लुटायला या वर्षी प्रथमच मीही येतोय, असे ट्वीट धनंजय मुंडे यांनी केले आहे.

लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव आणि त्यानंतर विधान परिषदेवर पंकजा मुंडे यांना संधी मिळाली. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे आक्रमक झाले आहेत. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लवकरच लागू होणार आहे. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात काय बोलणार याची उत्सुकता असणार आहे.

पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यातून बीड जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा ठरत असते. मात्र आता या मेळाव्याला महायुतीचेच नेते असलेले धनंजय मुंडे उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे काय बोलणार? याकडे बीडमधील जनतेचं लक्ष लागले आहे.

धनजंय मुंडेची पोस्ट

धनजंय मुंडे यांनी ट्विट करत ते दसरा मेळाव्याला जाणार असल्याची माहिती दिली. आपल्या ट्विटमध्ये धनंजय मुंडे म्हणाले आहेत की, 'आपला दसरा, आपली परंपरा...! ही परंपरा जोपासत आपल्याशी संवाद साधून विचारांचे सोने लुटायला या वर्षी प्रथमच मीही येतोय, भगवान भक्तीगडावर सावरगाव घाट येथे. या विजयादशमीला संत भगवानबाबांचे आशीर्वाद घ्यायला मी येतोय, तुम्हीही या...!'

नारायण गडावर जरांगेंचा मेळावा

बीड जिल्ह्यात पंकजा मुंडे यांचा मेळावा होत असतानाच बीड जवळील नारायण गड येथे मनोज जरांगे पाटील यांचा देखील पहिल्यांदाच दसरा मेळावा होणार आहे. मराठा आरक्षणासाठी आक्रमक असलेले मनोज जरांगे पाटील या मेळाव्यातून राजकीय भूमिका स्पष्ट करणार का? याकडे सर्वच पक्षांचे लक्ष असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT