मुंबई : माजी पोलिस आयुक्त आणि आयपीएस अधिकारी परमबीर सिंग (parambir singh)हे रशियात पळाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप केला होता. याप्रकरणी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. तसेच, सक्तवसुली संचलनालयाकडून देशमुख यांची चौकशी सुरू आहे. त्याशिवाय राज्य सरकारनेही सिंग याच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. हे सारे सुरू असतानाच सिंग हे भारतातून पळून गेल्याची बाब स्पष्ट झाली आहे.
याबाबत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse Patil) यांनी सांगितले आहे की, परमबीर सिंग रशियाला पळून गेल्याची माहिती आहे. मात्र, केंद्र सरकारच्या परवानगी शिवाय ते जाऊ शकत नाहीत. त्यांना परवानगी कुणी आणि कशी दिली हे तपासले जात आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या मदतीने आम्ही त्यांना शोधून काढू, असे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
''महाराष्ट्र सरकार त्यांचा शोध घेत आहे. त्यांच्यावर डिपार्टमेंटकडून कारवाई केली जाणार आहे. अनिल देशमुखांवर आरोप केल्यानंतर त्यांच्याबाबतही अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्याची उत्तरं सरकारला परमबीर सिंग यांच्याकडून हवी आहेत. सरकार नियमांनुसार जी कारवाई आहे ती करतं आहे,'' असंही दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केलं.
परमबीर सिंग यांनी आपल्याला प्रकृतीच्या काही तक्रारी जाणवत असल्याचं कारण देऊन रजा घेतली. मे ते ऑगस्ट या कालावधीत महाराष्ट्र सरकारने त्यांच्याशी संपर्क साधला. पण त्यांनी आधीची रजा वाढवून घेतली. माझी शस्त्रक्रिया झाली असून मला डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला असल्याचं त्यांनी सांगितलं. ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातही परमबीर सिंग यांनी आपली प्रकृती अद्याप ठीक झाली नसल्याचं सांगितलं आणि रजा वाढवून घेतली. परमबीर सिंग यांना 29 ऑगस्टला पुन्हा एकदा समन्स बजावण्यात आलं मात्र तेव्हापासून त्यांचा संपर्क होऊ शकलेला नाही.
7 एप्रिलला परमबीर सिंग हे तपास यंत्रणांसमोर हजर झाले होते. 25 फेब्रुवारीला झालेल्या अँटेलिया बॉम्ब प्रकरणात त्यांना समन्स जारी करण्यात आले होते. 25 फेब्रुवारीला घडलेल्या या प्रकरणानंतर 17 मार्चला परमबीर सिंग यांची मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून होम गार्ड्स खात्यात बदली करण्यात आली. त्यांनी या पदाचा पदभार 22 तारखेला स्वीकारला. त्यानंतर 4 मे पर्यंत ते कार्यालयात हजर राहिले. 5 मेपासून परमबीर सिंग सुट्टीवर गेले. तपास यंत्रणांनाही हेच वाटतं आहे की परमबीर सिंग यांनी देश सोडला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त देश सोडून रशियाला गेले असावेत असं तपास यंत्रणांना वाटतं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.