Pune News : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवत आहेत.
दादांना श्रद्धांजली म्हणून ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादीसह महायुतीच्या नेत्यांनी प्रयत्न केल्याचा पाहायला मिळाले. तरी देखील काँग्रेसने पोटनिवडणुकीसाठी उमेदवार दिला होता. मात्र वरिष्ठ नेत्यांनी मनधरणी केल्यानंतर अखेरच्या दिवशी काँग्रेसने उमेदवारी अर्ज मागे घेतला. उमेदवारी अर्ज मागे घेतला असला तरी अद्याप 20 अपक्ष निवडणूक रिंगणात असल्याने ही निवडणूक पार पाडत आहे.
त्यामुळे राष्ट्रवादीकडून काही प्रमाणात प्रचार देखील करण्यात आला असून आता या प्रचाराची सांगता उद्या होणार आहे. या सांगता सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्री आणि राज्यातील मंत्री उपस्थित राहणार आहेत. त्यापूर्वी आज खासदार पार्थ पवार यांनी सभास्थळाची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
पार्थ पवार म्हणाले, ही निवडणूक बिनविरोध व्हायलाच नव्हती पाहिजे. सगळ्या लोकांनी आपापल्या परीने उभं राहायला हवं होतं. कारण ही संधी होती कार्यकर्त्यांमध्ये दाखवायला दादांसोबत कोण आहेत आणि कोण सोबत नाही ते. मात्र पक्षातील अनेक लोकांची इच्छा होती की निवडणूक बिनविरोध व्हावी. त्यामुळे या लोकांचं ऐकून पक्षाच्या लोकांनी काही उमेदवारांना संपर्क केला. काहींना माघार घ्यायला लावली.
तरी देखील ही पण निवडणूक पूर्णता बिनविरोध झालीच नाही. काही लोकांच्या अनेक मागण्या होत्या आणि काही लोकांना मुद्दामून उभं केलं गेलं आहे. हे कोण लोक आहेत ते तुम्हाला लवकरच समजेल, असे पार्थ पवार म्हणाले.
उद्याच्या सभेला कोण कोण उपस्थित असणार याबाबत विचारला असता पार्थ पवार म्हणाले, उद्याच्या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योग मंत्री उदय सामंत, केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि खासदार सुप्रिया सुळे व इतर नेते असणार आहेत.
ही निवडणूक आम्ही मोठ्या मताधिक्याने जिंकणार आहे. मात्र ऊन खूप असल्याने लोकांना बाहेर काढण्याचे मोठा आव्हान असणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असून जे 2 लाख 70 हजाराचा रेकॉर्ड आहे ते मोडण्याचा प्रयत्न करणार असल्याच पार्थ पावर म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.