Parth Pawar reveals he declined the MP opportunity twice despite Ajit Pawar’s wish.  sarkarnama
महाराष्ट्र

Parth Pawar Video : 'मला दोनदा खासदार होण्याची संधी, अजितदादांची होती इच्छा...'; पार्थ पवारांनी सगळं सांगितलं

Parth Pawar Ajit Pawar : आपल्या वडिलांची इच्छा होती की मी खासदार व्हावे.मला दोनदा संधी उपलब्ध होती पण मी ती नाकारली होती,असे पार्थ पवार यांनी सांगितले आहे.

Roshan More

Parth Pawar News : पार्थ पवार यांनी गुरुवारी (ता.9) राज्यसभेचे खासदार म्हणून शपथ घेतली. या शपथविधी समारंभावेळी पार्थ पवार यांनी अजित पवारांप्रमाणे गुलाबी रंगाचे जॅकेट परिधान केले होते. शपथविधीनंतर त्यांनी संसद टिव्हीशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

ते म्हणाले, 'माझ्यासाठी हा भावनिक दिवस आहे. आज वडील असायला हवे होते. ते जीवंत असताना त्यांना मी याआधी दोनदा खासदार व्हावं असं वाटत होतं.पण पक्षासाठी मी संधी नाकारली. कारण मला पक्षातील दुसऱ्यांना संधी द्यायची होती.'

अजितदादांच्या आठवणीने पार्थ पवार भावूक झाले. ते म्हणाले, 'मला असं वाटतंय ते आज इथे असायला हवे होते. कधीकधी वाटतं मी आधीची संधी घ्यायला हवी होती. कदाचित त्यांनी मला बघितलं असतं.पण निशिबात जसं लिहिलेले असतं आपल्याला त्याला सामोरं जाव लागतं.'

'पक्षाने सांगितलं म्हणून आता मी ही जबाबदारी स्वीकारली आहे. पक्षाने ही संधी दिल्या त्याबद्दल मी आभार मानतो. पंतप्रधान,गृहमंत्री आणि माझी आई यांचे देखील आभार मानतो. पक्षाला माझ्याकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन.', असा शब्द देखील त्यांनी दिला.

वारशाला न्याय देण्याचा प्रयत्न...

पार्थ पवार यांनी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट केली. त्यामध्ये म्हटले आहे की, हा महत्त्वाचा टप्पा मी माझे स्वर्गीय वडील अजितदादा पवार यांना समर्पित करतो. त्यांचे मार्गदर्शन, मूल्ये आणि जनसेवेप्रती असलेली त्यांची निष्ठा मला दररोज प्रेरणा देते. त्यांनी १९९१ मध्ये आपल्या संसदीय प्रवासाची सुरुवात केली होती. आजच्या प्रसंगी ते माझ्यासोबत नाहीत, हे वेदनादायी आहे. मात्र त्यांचे आशीर्वाद माझ्यासोबत आहेत, याची मला खात्री आहे आणि त्यांच्या वारशाला न्याय देण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT