Satej Patil News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Rajaram Sugar Factory News : राजारामच्या बोगस सभासदांचा 'कंडका' पडला !

Amol Jaybhaye

Kolhapur News : साखर कारखान्याच्या बाबतीत राज्यात लक्षवेधी ठरलेल्या छत्रपती राजाराम सहकारी कारखान्याच्या बोगस सभासदाचा अखेर कंडका पडला. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर प्रादेशिक सहकारी साखर संचालकांनी फेरतपासणी केल्यानंतर 1 हजार 272 सभासद अपात्र ठरविले आहे. त्याची माहिती काँग्रेस (Congress) नेते आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी पत्रकार परिषदेत दिली. राजर्षि छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीच्या वतीने ही पत्रकार परिषद घेण्यात आली.

छत्रपती राजाराम कारखान्यावर माजी आमदार अमल महाडिक यांची सत्ता आहे. निवडणुकीपूर्वी फेब्रुवारी 2020 मध्ये प्रादेशिक साखर सहसंचालक यांच्याकडे राजर्षि छत्रपती शाहू परिवर्तनकडून 1 हजार 346 सभासद बोगस असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्याच्या चौकशी अंती 1 हजार 346 सभासद अपात्र केले होते. तर राज्याच्या सहकार विभागाने हा आदेश कायम केला होता. याला सत्ताधाऱ्यांनी उच्च न्यायलयात आव्हान दिले होते. मात्र, त्या ठिकाणीही उच्च न्यायालयाने हा निर्णय कायम केला.

हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) गेल्यानंतर न्यायालयाने अपात्रतेच्या निर्णयला स्थगित दिली होती. तसेच या सर्व अपात्र सभासदांची फेरसुनावणी घ्यावी, असे आदेश प्रादेशिक साखर सहसंचालक कोल्हापूर यांना दिले. त्यानुसार सर्व चौकशी अंती प्रादेशिक साखर सहसंचालक यांनी पुन्हा 1 हजार 272 सभासद अपात्र ठरवले. या प्रकरणातील सर्व कायदेशीर बाबी तपासून गुणदोषावर आदेश दिला व या पूर्वी अपात्र ठरवलेल्या 1 हजार 346 सभासदांपैकी 1 हजार 272 सभासद अपात्र ठरविले.

सत्याचा विजय झाला- सतेज पाटील

कारखान्याची निवडणूक यावर्षी झाली. यामध्ये कारखान्याच्या सत्तारुढ आघाडीने निवडणुक अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव टाकला, असा आरोप सतेज पाटील यांनी केला. आमच्या आघाडीचे इच्छूक उमेदवारांपैकी 30 उमेदवारी अर्ज छाननीतून बेकायदेशीरपणे अवैध ठरवले. आमचे 30 तगडे उमेदवार निवडणूक रिंगणाबाहेर घालविले. तरीसुध्दा सर्वसामान्य सभासदांच्या पाठबळावर आम्ही निवडणुकीला सामोरे गेलो. या निवडणुकीत अपात्र सभासदांच्या मतदानाचा समावेश होता. म्हणजे नियमित 11000 सभासदांचे मतदान झाले होते.

यापैकी 5000 ते 5500 मते आमच्या आघाडीला मिळाली. त्यामुळे खऱ्या सभासदांचा कौल आमच्या आघाडीला होता हे सिध्द झाले आहे. या अपात्र सभासदांचेमुळे आमच्या उमेदवारांना 1200 ते 1250 मतांच्या फरकाने पराभव पत्करावा लागला. जर हे अपात्र सभासद मतदानास पात्र झाले नसते तर आज कारखान्यावर आमचीच सत्ता असती हे सूर्यप्रकाशा इतके स्पष्ट असल्याचे सतेज पाटील म्हणाले. शेवटी सत्याचा विजय झाला. असेही त्यांनी सांगितले.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT