ED, BMC  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

ED Raids in Bmc Corona Scam : 'ईडी'च्या हाती मोठं घबाड; दीडशे कोटींच्या मालमत्तेची कागदपत्रं, 15 कोटींची एफडी आणि बरंच काही...

BMC News : 'बीएमसी'तील कोविड घोटाळाप्रकरणी ईडीने १५ ते १६ ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या.

सरकारनामा ब्यूरो

Mumbai: मुंबई महापालिकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी बुधवारी (दि.२१) ईडी( सक्तवसुली संचलनालय) कडून १५ ते १६ ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. या छापेमारीत तत्कालीन महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांसह ठाकरे गटाशी निकटवर्तीय असलेल्या सूरज चव्हाण यांचाही समावेश होता. आता या छापेमारीत ईडीच्या छापेमारीच्या कारवाईसंबंधी महत्वाची अपडेट समोर आली आहे.

'बीएमसी' (BMC) तील कोविड घोटाळाप्रकरणी ईडीने १५ ते १६ ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. या छापेमारीमुळे ठाकरे गटातील संबंधित व निकटवर्तीय चांगलेच अडचणीत आले आहेत. बुधवारी झालेल्या कारवाईनंतर पुन्हा गुरुवारी (दि.२२) सकाळीच ईडीची कारवाई सुरू झाली. मुंबई महापालिकेच्या दोन अधिकाऱ्यांवर ईडीची छापेमारी सुरू होती.

आता १६ ठिकाणी केलेल्या छापेमारीत ईडी(ED)च्या हाती १५० कोटींच्या मालमत्तांची कागदपत्रं, ५० मालमत्तांची कागदपत्रं तसेच १५ कोटींच्या एफडीची कागदपत्रं हाती लागल्याची माहिती समोर येत आहे. याचवेळी या कारवाईत अडीच कोटींचा मुद्देमालही ईडीनं ताब्यात घेतल्याची माहिती आहे. यात ६८ लाख रोख रक्कम आणि १ कोटी ८२ लाखांची सोन्याची दागिने जप्त केली आहे.

मुंबई महापालिकेच्या दोन अधिकाऱ्यांवर गुरुवारी(दि.२२) ईडीची छापेमारी सुरू होती. या दोन्ही अधिकाऱ्यांचा थेट कोविडच्या कथित घोट्याळ्याशी संबंध असल्याचे बोलले जात आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांचा थेट कोविडच्या कथित घोट्याळ्याशी संबंध असल्याचे बोलले जात आहे. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. काल झालेल्या कारवाईत मुंबई पालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या निवासस्थानी छापेमारी केली.

खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांचे जवळचे मानले जाणारे सुजीत पाटकर यांच्याही घरी धाडी टाकण्यात आली. यानंतर आदित्य ठाकरे यांचे अतिशय खास व्यक्ती सुरज चव्हाण यांच्या चेंबूप येथील घरावरही धाड टाकण्यात आली. विविध ठिकाणी एकूण 16 ठिकाणी छापेमारीची कारवाई झाली होती.

साडे सोळा तास छापेमारी...

सुरज चव्हाण यांच्या घराच सकाळी 9 वाजताच छापेमारीची कारवाई सुरू झाली. सकाळी 9 ते रात्री दीड वाजेपर्यंत ईडीचे धाडसत्र सुरूच होते. साडे सोळा तासांपेक्षा अधिक काळ ही छापेमारी सुरु होती. इतकी दीर्घ कारवाई झाल्याने एकच खळबळ उडाली. सूरज चव्हाणची कसून चौकशी केल्याचं सांगितलं जात आहे.

किरीट सोमय्यांचा आरोप काय..?

राऊतांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांच्या लाईफलाईन कंपनीला नियमबाह्य काँन्ट्रॅक्ट देण्यात आल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्यां(Kirit Somaiya) चा यांचा आरोप आहे. कोरोना संसर्ग काळात राज्य शासनाने जुलै २०२० मध्ये कोरोना केअर सेंटर सुरू केले होते. मुंबई महापालिका आणि पुणे महापालिकेकडून या केंद्रांची उभारणी करण्यात आली होती.

त्यात शिवाजीनगरमधील कोरोना सेंटर चालवण्याचे कंत्राट सुजित पाटकर यांच्या लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनीला देण्यात आले. पीएमआरडीए आणि करोना कृती दलाने दिलेल्या नियमांचे उल्लंघन करण्यात आले. या टेंडर बहाल करण्यामागे अधिकारीही होते का? याचा तपास केला जाणार आहे. ईडीच्या रडारवर तत्कालीन मुंबई पालिकेतील इतरही आणखी काही अधिकारी आहेत अशी शक्यता आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT