Ajit Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ajit Pawar Parner Sabha : पारनेरमध्ये वर्षभरात 1500 कोटींची विकासकामे दाखवून देईल; अजित पवारांचा शब्द

Nilesh Lanke News : या सभेतून अजित पवारांनी सुजय विखेंनाही एकप्रकारे आव्हानच दिले आहे

अनुराधा धावडे

Nagar Politics : येत्या वर्षभरात आमदार नीलेश लंकेंच्या मतदारसंघात १५०० कोटींची विकासकामे करणार असल्याचे आश्वासन देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लकेंना पूर्ण पाठिंबा देणार असल्याची आश्वासन पारनेरवासीयांना दिले आहे. अजित पवार यांची आज पारनेरच्या हंगा येथे जंगी सभा झाली. याचवेळी अजित पवारांच्या हस्ते 'माता मोहटादेवी महिला देवदर्शन यात्रे'चा शुभारंभ करण्यात आला.

विशेष म्हणजे या सभेच्या निमित्ताने गेल्या काही महिन्यांपासून लंके-विखे यांच्यातील संघर्षावरही अजित पवारांनी लकेंना पाठिंबा देत अप्रत्यक्षपणे विखे पिता-पुत्रांनाही एकप्रकारे आव्हान दिले आहे. त्यामुळे आगामी काळात लंके-विखेंचा संघर्ष वाढणार असल्याचे दिसत आहे.

अजित पवार म्हणाले, सरकारमध्ये अनेकदा उपमुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. राज्याचे अर्थमंत्रिपद माझ्याकडे आहे. चार वर्षांपूर्वी तुम्ही नीलेश लंकेंना निवडून दिले. निवडणुकीला अजून एक वर्ष बाकी आहे, पण पुढच्या वेळी मी नीलेश लंकेंच्या प्रचार सभेला येईल, त्यावेळी लंकेंच्या मतदारसंघात १५०० कोटींची विकासकामे झाल्याचे दाखवून देईल.

आम्ही सर्वजण मिळून ही कामे करणार आहोत. पारनेरमध्ये 333 ट्रान्सफॉर्मर नीलेश लंकेंच्या कामातून लागले, अशाप्रकारची 40 कोटींची विकासकामे पारनेरमध्ये होतील. महाराष्ट्राची जनता 288 लोकप्रतिनिधी निवडून देते, पण या 288 लोकप्रतिनिधींमध्ये जागरूक लोकप्रतिनिधी कसा असावा, तर तो नीलेश लंकेंसारखा असावा, असे म्हणत त्यांनी लंकेंचे कौतुकही केले.

आमदार झाल्यापासून लकेंनी लोककार्याचा धडाका लावला. कोरोना काळातही लकेंनी काम केले. पुण्यातूनही लोकांनी लकेंना मदत केली. आमच्यावर घराणेशाहीची टीका होते. नीलेश लंके यांच्या पाठीशी उभे राहणे हे आमचे कर्तव्य आहे. घरणेशाहीला हे उत्तर आहे, असेही त्यांनी नमूद केले.

उद्या आपली सत्ता असो वा नसो, लोकांना त्याच्याशी काही घेणे-देणे नाही; पण त्यांच्या कामाशी घेणे-देणे आहे. आमदार लंकेंच्या काम पाहून तुम्ही निवडलेल्या लोकप्रतिनिधींबाबत तुम्हालाही त्यांचा अभिमान वाटत असेल, अशा भावनाही अजित पवारांनी व्यक्त केल्या.  

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT