Ranjitsinh Mohite-Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Maharashtra Budget : अर्थसंकल्पात माळशिरस तालुक्यासाठी 160 कोटी; कोर्टाच्या इमारतीचे काम मार्गी लागणार !

Ranjitsinh Mohite-Patil : रस्त्यांची कामे लागणार मार्गी, तलावांची होणार दुरुस्ती

सरकारनामा ब्युरो

Solapur News: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गुरुवारी (ता. ९) राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून राज्याच्या विविध भागातील पायाभूत विकासकामांसह समाजातील सर्व घटकांसाठी काही ना काही देण्याचा प्रयत्न केला आहे. सोलापूर जिल्ह्यातून भाजपच्या आमदार आणि खासदारांची संख्या मोठी आहे. मात्र या अर्थसंकल्पात सोलापूर जिल्ह्याला फारसे काही मिळाले नाही. त्या तुलनेत माळशिरस तालुक्यासाठी १६० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील माळशिरस (Malshiras) तालुक्यासाठीही या अर्थसंकल्पात भरघोस तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे तालुक्यातील प्रतिक्षेत असलेल्या न्यायालयाच्या इमारतीचे काम मार्गी लागणार आहे. माळशिरसमधील विविध रस्त्यांसाठी, लघुपाटबंधारे विभागाअंतर्गत असणाऱ्या तलवांच्या दुरुस्तीसाठीही निधी देण्यात आला आहे. त्यामुळे तालु्क्यातील शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत.

माळशिरस तालुक्यातील विविध पायाभूत सुविधांसाठी अर्थसंकल्पात तब्बल १६० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे आमदार रणजीतसिंह मोहते पाटील (Ranjitsinh Mohite-Patil) यांनी शिंदे-फडणवीस सरकारचे आभार मानले आहेत.

माळशिरस तालुक्यासाठी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते (Vijaysingh Mohite) यांनी स्वतंत्र जिल्हा न्यायालय मंजूर करून घेतले होते. हे न्यायालय (Malshiras Court) व पूर्वीची न्यायालयांचे कामकाच जुन्या इमारतीतच सुरू आहे. त्यामुळे येथे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्या सोडवण्यासाठी येथे प्रशस्त इमारतीची गरज निर्माण झालेली आहे. या न्यायालयाच्या इमारतीसाठी अर्थसंकल्पात २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे या इमारतीचे काम मार्गी लागण्यास मदत होणार आहे.

न्यायालयासह माळशिरस तालुक्यातील विविध पायाभूत सुविधांसाठी १३९ कोटी ७८ लाख ४९ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यातील १०६ कोटी ६६ लाख रुपये तालुक्यातील विविध रस्त्यांच्या कामांसाठी असणार आहेत. तसेच तालुक्यातील रखडलेले रस्ते आणि लघुपाटबंधारे विभागाच्या तलावांच्या दुरुस्तीसाठी एकूण ३२ कोटी १२ लाख ४९ हजार रुपायंची तरतूद केली आहे. या निधीमुळे तालुक्यातील दळणवळण सुधारण्यास मदत होणार आहे. तसेच तलाव दुरुस्त झाल्यांनतर शेतकऱ्यांचाही पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याचे आमदार रणजीतसिंह मोहते-पाटील (Ranjitsinh Mohite-Patil) यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT