Mahavikas Aghadi Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sharad Pawar: 'मविआ'चे किती आमदार निवडून येणार? शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून आकडा जाहीर

MVA MLA Predictions from Sharad Pawar: आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात आपलंच सरकार येणार असा दावा महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांकडून केला जात आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी थेट आघाडीचे किती आमदार निवडून येतील याबाबतचा आकडाच सांगितला आहे.

Jagdish Patil

Solapur News, 08 Nov : आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात आपलंच सरकार येणार असा दावा महायुती आणि महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) नेत्यांकडून केला जात आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी थेट आघाडीचे किती आमदार निवडून येतील याबाबतचा आकडाच सांगितला आहे.

विधानसभा निवडणुकीत 'मविआ' सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील 90 टक्के जागांवर विजय मिळवेल. महायुती सरकारकडून अनेक चुकीची कामे झाली आहेत. त्यामुळे राज्यात आघाडीचं सरकार येईल.

मोठ्या नेत्यांवर भुंकण्यासाठी छोटे नेते

या निवडणुकीत आघाडीचे 170 आमदार निवडून येईल अशी परिस्थिती असल्याचं रोहित पवार (Rohit Pawar) यांनी म्हटलं आहे. ते सोलापुरातील पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. 2014 पासून राज्यातील नेत्यांची भाषा बदलण्यास फडणवीस जबाबदार आहेत.

ते स्वत: मोठ्या नेत्यांवर बोलू शकत नाहीत यासाठी ते मोठ्या नेत्यांवर भुंकण्यासाठी छोटे नेते सांभाळून ठेवतात आणि त्या छोट्या नेत्यांना बिस्किट म्हणून पदं दिली जातात. तसंच सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्याला देखील फडणवीसचं (Devendra Fadnavis) कारणीभूत असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं.

दरम्यान यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत अनेक नक्षली विचारांच्या संघटना सहभागी झाल्या होत्या, या देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "फडणवीस अभिमन्यू आहेत की नाही आहेत? हे माहिती नाही. मात्र ते नव्या युगातले जनरल डायर नक्की आहेत. महायुतीच्या काळात फडणवीस गृहमंत्री होते.

त्यांनी पोलिस प्रशासनाचा चुकीच्या पद्धतीने वापर केला. त्यांच्या सांगण्यावरून अनेकांवर लाठीचार्ज झाला. त्यामुळे फडणवीस साहेबांनी सांगितलं असा रिपोर्ट द्या तर त्यांनी दिला असेल. भारत जोडो यात्रेला दोन वर्ष पूर्ण झाले आणि त्यांना आता का आठवते? असा सवाल करत फडणवीस हे संविधानाच्या विषयावर चर्चा करून महत्त्वाच्या मुद्द्यावरून ते लक्ष दुसरीकडे घेऊन जात आहेत. संविधान वाचलं असतं तर फडणवीस भाजपमध्ये नसते, गुजरातची लाचारी सोडून साहेबांनी मुद्द्याचं बोलावं."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT