Satara, 11 September : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी मतदारांची अंतिम यादी आज (ता. ११ सप्टेंबर) प्रसिद्ध झाली. यामध्ये आठ ठराव रद्द झाले आहेत. कच्च्या यादीतील २०२७ मतदारांपैकी २०१९ मतदार अंतिम यादीत राहिले आहेत. महाबळेश्वर, माण, फलटण आणि कोरेगाव सोसायटीत प्रत्येकी एक ठराव कमी झाला आहे, तर खरेदी-विक्री संघ, नागरी बॅंका-पतसंस्था मतदारसंघातील प्रत्येकी एक आणि गृहनिर्माणचे दोन ठराव रद्द झाले आहेत.
दरम्यान, आजपासून दहा दिवसांनंतर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. त्यामुळे सप्टेंबरच्या २४, २५ तारखेला निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.
सातारा जिल्हा बॅंकच्या निवडणुकीसाठी विद्यमान संचालकांसह काही निवडक इच्छुकांनी आपापल्या सोसायटीसह इतर मतदारसंघातून ठराव केले आहेत. आता अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यामुळे इच्छुकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. आता दिग्गज नेत्यांच्या बैठका कधी होणार आणि नवीन इच्छुकांना संधी मिळणार का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
जिल्हा बॅंकेसाठी प्रसिद्ध झालेल्या अंतिम मतदार यादीत २०१९ मतदार असून, यामध्ये ९६३ मतदार अकरा विकास सोसायटीचे आहेत, तसेच खरेदी-विक्री संघ मतदारसंघातील दहा, कृषी प्रक्रिया मतदारसंघातील २९, नागरी बॅंका-पतसंस्था मतदारसंघातील ३७९, गृहनिर्माण आणि दूध संस्था मतदारसंघातील २९५, औद्योगिक विणकर, मजूर संस्था मतदारसंघातील ३४३ मतदार राहिले आहेत.
कच्ची मतदार यादी प्रसिद्धीवेळी २०२७ मतदार संख्या होती. आज प्रसिद्ध झालेल्या अंतिम मतदार यादीत २०१९ मतदार राहिले आहेत. एकूण आठ ठराव रद्द झाले आहेत. औद्योगिक विणकर व मजूर संस्था मतदारसंघात १२ ठराव वाढले आहेत.
यादी प्रसिद्ध झाल्यामुळे निवडणूक कार्यक्रम आजपासून दहा दिवसांनंतर म्हणजेच २१ सप्टेंबरनंतर पाच दिवसांत कधीही निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे, तर ४५ दिवसांनंतर मतदानाची तारीख असेल. त्यामुळे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मतदान होण्याची शक्यता आहे.
११ सोसायट्यांची मतदारसंख्या :
सातारा १४६, जावळी ४८, महाबळेश्वर १२, कऱ्हाड १४६, पाटण १०४, कोरेगाव ९०, खटाव १०२, माण ७५, खंडाळा ५०, वाई ५९, फलटण १३१ असे एकूण ९६३ मतदार आहेत.
....................
कमी, रद्द व वाढलेल्या मतदारांची संख्या :
सोसायटी : चार,
खरेदी विक्री संघ : एक
कृषी प्रक्रिया संस्था : शून्य,
नागरी बॅंका-पतसंस्था : एक
गृहनिर्माण आणि दूध संस्था : दोन
एकूण रद्द झालेले ठराव : आठ
जिल्हा बॅंक : एकूण संचालक २१
सोसायटी मतदारसंघ संचालक : ११
खरेदी-विक्री संघ, कृषी प्रक्रिया संस्था, नागरी बॅंका व पतसंस्था, गृहनिर्माण व दूध संस्था, औद्योगिक व विणकर संस्था : प्रत्येकी एक.
...............................
राखीव जागा : एकूण पाच
महिला राखीव : दोन
अनुसूचित जाती, जमाती प्रतिनिधी : एक
इतर मागास प्रवर्ग : एक
विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्ग : एक
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.