मिरज (जि. सांगली) : राज्यातील सत्ताकारणात मोठी उलथापालथ झाल्यानंतर त्याचे परिणाम स्थानिक पातळीवरील राजकारणात दिसू लागले आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट आणि शिवसेनेच्या (Shivsena) स्वागत कमानीवरून सुरू असलेल्या वादात सांगलीच्या (Sangli) मिरजेतील (miraj) महाराणा प्रताप चौकात गेली २५ वर्षांपासून शिवसेनेकडून उभरण्यात येणाऱ्या स्वागत कमानीला यंदा पोलिसांनी परवांनगी नाकारली आहे. (25 years tradition will be broken in Eknath Shinde group-Shiv Sena dispute)
महाराणा प्रताप चौकातील जागेत यंदा शिंदे गटाकडून कमानीसाठी दावा करण्यात आला होता. तर शिवसेनेकडूनही परंपरेनुसार आणि पुर्वश्रमाचा इतिहास पाहून प्रशासनाकडून शिवसेनेला या ठिकाणी कमान उभी करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी करण्यात आली होती.
या संघर्षावर पोलिसांनी दोन्ही गटांची बैठक बोलावून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला असता मार्ग निघू शकला नाही. शिवसेनेकडून या जागेवर दावा करण्यात आला आहे. तर शिंदे गटाकडून आम्ही शिवसेनेचे खरे शिवसैनिक आहोत, यामुळे आम्हीच कमान उभी करू यावर ठाम आहेत. या सर्वांवर पोलिस प्रशासन दरबार बैठक झाली दोन्ही गटांना पर्यायी जागेचा मार्ग सुचविण्यात आला आहे. मात्र, दोन्ही गटाकडून एकाच जागेवर दावा करण्यात आला आहे.
एकनाथ शिंदे आणि शिवसेना या दोन्ही गटाचा संघर्ष बघता शिंदे गट आणि शिवसेना या दोघांना परवानगी देण्यात आलेली नाही. यामुळे सेनेकडून गेली २५ वर्षापासून उभारली जाणारी स्वागत कमान यंदा पोलिस प्रशासनाकडून परवानगी न मिळाल्यामुळे खंड पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.