Solapur, 28 March : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी एकूण ४२९ उमेदवारांनी ४७९ अर्ज दाखल झाले आहेत. यात माजी आमदार तथा माजी सभापती दिलीप माने, त्यांचे चिरंजीव पृथ्वीराज माने, आमदार सुभाष देशमुख यांचे चिरंजीव मनीष देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळीराम साठे, राज्य सहकारी बॅंकेचे माजी संचालक अविनाश महागावकर, राजशेखर शिवदारे, सुरेश हसापुरे, इंद्रजित पवार यांच्यासह बहुतांश संचालक पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे ही निवडणूक रंगतदार होणार हे स्पष्ट आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Solapur Bazar Samiti) एकूण १८ संचालकांच्या जागांसाठी तब्बल ४२९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यामध्ये सहकारी संस्था सर्वधारण - 151, सहकारी संस्था महिला राखीव - 31, सहकारी संस्था इतर मागासवर्ग -26, सहकारी संस्था विमुक्त जाती भटक्या जमाती - 37, ग्रामपंचायत सर्वसाधारण - 108, ग्रामपंचायत अनुसूचित जाती, जमाती - 33, ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटक -20, व्यापारी प्रतिनिधी - 56, हमाल तोलार प्रतिनिधी - 17 असे एकूण 479 अर्ज दाखल झाले आहेत.
सोलापूर (Solapur) बाजार समितीच्या निवडणुकीत एकूण 835 अर्जांची विक्री झाली आहे. त्यातील 479 अर्ज दाखल झाले आहेत. तब्बल ५० उमेदवाराने दोन अर्ज भरले आहेत, उर्वरीत 429 जणांनी सिंगल उमेदवार अर्ज भरले आहेत, त्यामुळे बाजार समितीसाठी 479 अर्ज दाखल झाले आहेत.
बाजार समितीच्या निवडणुकीसाठी दाखलेल्या 479 अर्जांची छाननी एक एप्रिल रोजी होणार आहे. त्यानंतर दोन ते 16 एप्रिल दरम्यान उमेदवारांना अर्ज माघारी घेता येणार आहे. त्यानंतर 17 एप्रिलला पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध होणार आहे.
दरम्यान, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी माजी संचालक अविनाश मार्तंडे, इंदुमती अलगोंडा पाटील, बाळासाहेब शेळके, हरीश पाटील, राजेंद्र सुपाते, बाळासाहेब पाटील, केदार उंबरजे, माजी नगरसेवक किसन जाधव, शिवसेनेचे अमोल शिंदे, सिद्धाराम चाकोते, अमर पाटील, कळमणचे उपसरपंच सुनील पाटील, भीमाशंकर रमणशेट्टी, धनेश आचलारे, संतोष पवार, केदार विभूते अन्नप्पा सत्तूबर, इंद्रजीत लांडगे, सिद्धाराम हेले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.