shekhar Gore
shekhar Gore sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

शेखर गोरेंना अडचणीत आणणारेच आले अडचणीत

सरकारनामा ब्युरो

म्हसवड : स्वतःच्या अपहरणाचा खोटा बनाव करून शिवसेनेचे नेते शेखर भाऊ गोरे यांना विनाकारण अडचणीत आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवरच म्हसवड पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. डॉ. नानासो शिंदे यांच्यासह अन्य दोघांवर खोटी माहिती देवून खरी माहिती लपवल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

म्हसवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही महिन्यांपूर्वी माण तालुक्यातील पानवण येथील घडलेल्या अपहरण प्रकरणाच्या गुन्ह्यातील एकंदरीत तपासात २७ फेब्रुवारी २०२१ रोजी रात्री नऊ ते साडे दहाच्या दरम्यान, पानवण (ता. माण) हद्दीत पानवण ते ढाकणी जाणाऱ्या रोडवर कुंभेरीची वगळी जवळील पुलावर डॉ. नानासाहेब शिंदे (वय ५७), संजय किसन शिंदे (वय ३६), संतोष किसन शिंदे (वय ३५) सर्व राहणार पानवण (ता. माण) यांनी आपसात संगनमत करून डॉ. नानासो शिंदे यांच्या अपहरणाचा बनाव करून डॉ. शिदे यांनी स्वतःच गाडी (एम.एच १४ डी.ए.४००४) च्या शीटवर डिझेल ओतून पेटवुन दिली आहे, असा खोटा पुरावा तयार केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

तसेच त्यांनी घडल्या प्रकाराबाबत पोलिसांना खोटी माहिती देऊन शिवसेनेचे नेते शेखर भगवान गोरे यांना अडकविण्याच्या प्रयत्नातून अपहरणाचा बनाव केला आहे. त्यानुसार डॉ. नानासो आण्णा शिंदे, संजय किसन शिंदे, संतोष किसन शिंदे (सर्वजण रा. पानवण ता. माण) यांच्याविरुद्ध भा.द.वि कलम 435,176,177,182,193,195(अ),196,34 प्रमाणे तक्रार दाखल झाली आहे. अधिक तपास वरिष्ठांच्या सूचनेनुसार म्हसवड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक बाजीराव ढेकळे यांच्या मार्गदर्शनाखाली आर. व्ही. डोईफोडे करत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT