अक्कलकोट : अक्कलकोट विधानसभा क्षेत्राचे आमदार सचिन कल्याणशेट्टी (Sachin Kalyanshetti) आणि काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) या दोघांमध्ये मंगळवारी (२२ मार्च) दिवसभर ट्विटरवर शाब्दिक चकमकी झाल्याचे पाहायला मिळाले. ( Sachin Kalyanshetti- Sachin Sawant twitter war)
सचिन कल्याणशेट्टी यांनी भाकड गाईंच्या मुद्याला सवाल उपस्थित करत भाकड गाई कत्तलखान्यात जाऊ द्यायच्या नसतील तर सर्वत्र गोशाळा उभारण्याची मागणी केली. कल्याण शेट्टी म्हणाले की, भाकड जनावरे पोसण्यासाठीचा खर्च सामान्य शेतकर्यांना परवडत नाही. त्यामुळे गाई नाईलाजाने कत्तलखान्यात पोहचतात. त्यांचे संगोपन केल्यास गोमुत्र आणि शेणखताचा वापर करून, सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देता येईल. या भाकड जनावरांच्या संगोपनाकरिता गोशालेची निर्मिती शासनाने करावी. अशी मागणी कल्याणशेट्टी यांनी केली.
तसेच, भाकड जनावरे ही गरज संपल्याने निरुपयोगी आहेत, असे वाटते आणि यांना जास्त खर्चांने सांभाळ करणे अडचणीचे ठरते. त्यासाठी गोशाळा योजना सुरू केल्यास शेतकरी बांधवाना लाभ होईल, असेही कल्याणशेट्टी यांनी स्पष्ट केले.
तर आमदार कल्याण शेट्टी यांच्या या विषयाला सचिन सांवत यांनी उत्तर दिले. " संघपरिवार शेणापासून साबण, गोमूत्राचा शैंपू, औषधे बनवून अमेझॉनवर विकणार होते, त्याचे काय झाले? भाजपाचे नेते ही उत्पादने वापरतात का? असा सवाल सचिन सावंत यांनी कल्याणशेट्टी यांना केला.
सावंत यांच्या प्रश्नांवर कल्याणशेट्टी यांनी, "सचिनजी कमाल आहे मी कुणावर टीका नाही केली, मी तर शासनाला एका चांगल्या विषयावर सूचना केली. त्यात तुम्हाला इतका त्रास कशाचा ? तुम्हाला झोपेतून उठल्यावर भाजप आणि संघच दिसत आहे. त्यात राज्यपाल महोदयांनी तुमच्या 12 आमदारांना लटकत ठेवले म्हणून आपली वैफल्यग्रस्त मनस्थिती मी समजू शकतो ! असे म्हणत कल्याणशेट्टी यांनी चिमटा काढला.
तर " 2018 ला संघाने गोमूत्र, शेणावर प्रक्रिया करुन शँपू, औषधे व साबण तयार करणार सांगितले. रिसर्च पूर्ण झाले तर शेतकऱ्यांना फायदा होईल. गाई कत्तलखान्यात पोहोचणार नाहीत. युपीचाही भाकड गाईंचा प्रश्न सुटेल. सचिन जी, फक्त प्रश्न विचारला. लगेच मनस्थिती वगैरे? लोकांना फसवले की त्रास होणारच ! असा टोलाही सावंत यांनी लगावला. याच खास बाब म्हणजे सोशल मिडीयावर झालेल्या या दोघांच्याही जुगलबंदीत त्यांच्या समर्थकांनीही आपापल्या नेत्यांची बाजू लावून धरली. ज्यामुळे सोशल मिडीयावर झालेल्या या जुगबंदीची चांगलीच चर्चा रंगली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.