Kesarkar Criticized Thackeray : Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kesarkar Criticized Thackeray : उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर ; केसरकर म्हणाले, काहीजण...

Thackeray-shinde Group Politics : दीपक केसरकर दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत, तर उद्धव ठाकरे आज नगर जिल्ह्यातील दुष्काळी भागाच्या दौऱ्यावर आहेत.

अनुराधा धावडे

Kolhapur Political News : काहीजण बांधावर जाण्याचंदेखील राजकारण करतात. आम्ही जे काम करतो ते बांधावर जाऊन सुटत नाही. त्यासाठी बैठका घ्यावा लागतात. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करत होते. मात्र उद्धव ठाकरेंकडून शंभर टक्के राजकारण केलं जात असल्याचा टोला राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

दीपक केसरकर दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत, तर उद्धव ठाकरे आज नगर जिल्ह्यातील दुष्काळी भागाच्या दौऱ्यावर आहेत. ठाकरेंच्या या दौऱ्यावरच केसरकरांनी निशाणा साधला आहे. बांधावर पाणी गेलं पाहिजे, यासाठी आम्ही काम करतो यालाच शिंदे फडणवीस आणि पवार यांचे सरकार म्हणतात. केवळ आपण काही तरी करतोय हे दाखवण्यासाठी मीडियासमोर जाऊ नये, असंही केसरकरांनी म्हटले आहे.

मराठा आरक्षणावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली जाते. त्यावरून बोलताना केसरकर यांनी, "ज्या देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण हायकोर्ट टिकून दाखवलं त्यांच्यावर टीका करणे योग्य नाही. एखाद्या पोलिसांकडून चूक झाली तर फडणवीस यांना धारेवर धरणे याला राजकारण म्हणतात." असे म्हंटले आहे.

स्वराज्यावर चाल करून येणाऱ्या अफजल खानाला ज्या वाघनख्यानी फाडला, त्या वाघ नख्या आता महाराष्ट्रात येणार आहेत. त्याबाबतची महत्त्वाची माहिती केसरकर यांनी दिली आहे. ब्रिटनमधून शिवरायांच्या वाघनख्या महाराष्ट्रात आणण्याचे काम राज्य सरकारचे सुरू झाले आहे. शिवरायांची प्रत्येक गोष्ट राज्याला प्रेरणा देणारी आहे. संपूर्ण महाराष्ट्र त्याचं स्वागत करेल, असेही केसरकर म्हणाले.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT