Hasan Mushrif, Samarjit Singh Ghatge
Hasan Mushrif, Samarjit Singh Ghatge sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

"जेवण देता म्हणजे तुम्ही उपकार करत नाही" : घाटगे - मुश्रीफांमध्ये नव्या वादाची ठिणगी

सरकारनामा ब्युरो

कागल : बांधकाम कामगारांना देण्यात येणारे जेवण निकृष्ट दर्जाचे आहे. या तक्रारीचा पाढा लाभार्थी कामगारांकडून वाचला जात आहे. मुश्रीफसाहेब, तुम्ही तुमच्या खिश्यातील पैशातून किंवा तुमच्या घरातून हे जेवण देत नाही. तर महाराष्ट्र शासनाच्या पैशातून हे जेवण मिळते. या जेवणाबाबत सुधारणा करण्यात यावी, अन्यथा यामध्ये गांभीर्याने आम्हाला लक्ष घालावे लागेल‌. असा खणखणीत इशारा शाहू ग्रुपचे प्रमुख आणि भाजपाचे (BJP) जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे (Samarjit Singh Ghatge) यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांना दिला.

घाटगे पुढे म्हणाले, एका बांधकाम कामगार महिलेने चांगल्या दर्जाच्या जेवणाची मागणी करणे हा तुमच्या हिशोबाने गुन्हा आहे का? तुमचे जेवणच बंद करू का? असे ज्या पद्धतीने तुम्ही त्या महिलेला उत्तर दिलं ते सर्वप्रथम तुमची ही मग्रुरता थांबवा, लोकांवर तुम्ही उपकार करीत असल्याची प्रवृत्ती तातडीने बंद करा. तुम्ही जेवण देता म्हणजे काही उपकार करत नाही, हे तुमचं म्हणजेच शासनाचे कर्तव्यच आहे.

जेवणाच्या दर्जावर जे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्याबाबत वर्तमानपत्रांमध्ये बातम्या येत आहेत. लोक शंका घ्यायला लागले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारतीय कामगार मजदूर महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिजीत केकरे यांनीही यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. त्याप्रमाणे जेवणाचा दर्जा सुधारा. तुम्ही याबाबत तातडीने कारवाई करा किंवा केकरे यांनी सुचवल्याप्रमाणे व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणानुसार थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर १२० रूपये वर्ग करण्यात यावे, अशी मागणीही समरजितसिंह घाटगे यांनी केली.

तसेच जर लोकांना १२० रुपये खर्च करून चांगल्या दर्जाचे जेवण मिळत नसेल तर हे १२० रुपये कुठे खर्च होतात. याचे पण संशोधन मुश्रीफ यांनी केले पाहिजे. मी जे प्रश्न उपस्थित केले आहेत, ते प्रश्न तुम्ही भावनिक आवाहन करून दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करू नका असा टोलाही घाटगे यांनी मंत्री मुश्रीफांना लगावला आहे. यामुळे जन्मतारखेवरुन सुरु झालेला वाद शांत होतो की नाही तो पर्यंत नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT