Sangali Municipal Corporation  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangali Municipal Corporation : लोकशाही दिनाच्या कार्यक्रमात नागरिकाला संताप अनावर; आयुक्तांना बूटच फेकून मारला

Sangali News : संतप्त कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन; महापालिकेच्या परिसरात तणावाचे वातावरण

सरकारनामा ब्यूरो

sangli : सांगली महापालिकेतील आयुक्तांवर एका व्यक्तीकडून बूट फेकून मारत शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी कैलास काळे नामक व्यक्तीला ताब्‍यात घेतलं आहे.

या घटनेनंतर महापालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन करत या घटनेचा निषेध व्यक्त केला. महापालिकेत घडलेल्या या घटनेनंतर काही वेळ महापालिकेच्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं.

नेमकं काय घडलं?

सांगली महापालिकेत लोकशाही दिनानिमित्त आयुक्त कार्यालयात वेगवेगळ्या तक्रारी ऐकून घेत ते प्रश्न मार्गी लावण्याचा कार्यक्रम सुरू होता. यावेळी आयुक्त आणि उपायुक्त देखील उपस्थित होते.

या दरम्यान, कैलास काळे नामक व्यक्तीने गुंठेवारी प्रमाणपत्रासंदर्भात आयुक्तांकडे तक्रार केली. मात्र, कायदेशीरदृष्ट्या ही तक्रार घेता येत नाही, असं आयुक्तांनी संबधित व्यक्तीला सांगितलं.

तसेच या संदर्भात वरिष्ठ स्तरावर तक्रार दाखल करा, असं आयुक्तांनी त्या व्यक्तीला सांगितलं. मात्र, राग अनावर झाल्याने कैलास काळे यांनी आयुक्त सुनील पवार यांच्या दिशेने पायातला बूट फेकला आणि शिवीगाळ केली.

यानंतर तेथे उपस्थित असणाऱ्या पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कैलास काळे या व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात दिलं. या घटनेनंतर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन करत निदर्शने केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT