Sunita Ashok Bhangare
Sunita Ashok Bhangare Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

नगर जिल्हा परिषदेतील महिला सदस्या धमकावणाऱ्याने मागितली लेखी माफी

शांताराम काळे

अहमदनगर - अहमदनगर जिल्हा परिषदेतील सदस्या तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक भांगरे ( Ashok Bhangre ) यांच्या पत्नी सुनीता भांगरे यांना एका व्यक्तीने दुरध्वनीवरून धमकी दिली होती. या विरोधात सुनीता भांगरे यांनी राजूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या धमकावणाऱ्या व्यक्तीने आता जाहीरपणे लेखी माफी मागितली आहे. ( A woman member of Nagar Zilla Parishad apologized for threatening )

सुनीता भांगरे या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प समितीच्या सदस्या देखील आहेत. त्यांना मुतखेल आश्रम शाळेतील गैरप्रकाराबाबत तेथील मुख्याध्यापकाच्या भावाने दुरध्वनी वरून धमकी दिली होती. त्या धमकी वरून त्या इसमावर राजूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

स्थानिक राजूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केल्याप्रमाणे पोलिसांनी कार्यवाही सुरू केली. त्यामुळे सुनीता भांगरे यांना धमकी देणाऱ्या रामेश्वर गजानन शातलवार यांनी लेखी माफीनामा दिला आहे. माझ्याकडून असले कुठलेही कृत्य होणार नाही असे त्याने माफीनाम्यात सांगितले आहे. त्यामुळे भांगरेंच्या कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT