सोलापूर : अकलूजमधील एका विवाह सोहळ्याची राज्यात चांगलीच चर्चा रंगली आहे. या विवाह सोहळ्याचं कारणही तसंच आहे. मुंबईतील (Mumbai) दोन जुळ्या बहिणींनी अकलूजच्या एका तरुणासोबत लग्न केलंय. त्यामुळे या विवाहाची राज्यभर एकच चर्चा रंगलीय. मात्र जुळ्या बहिणींशी लग्न करणारा हा तरुण नव्या संसाराला सुरुवात करण्याआधीच अडचणीत आला आहे.
जुळ्या बहिणींच हे लग्न कसं जुळलं?
अतुल अवताडे असं या तरुणाचं नाव असून तो मुळचा माळशिरस (Malshiras) तालुक्यातील अकलूजचा आहे. या तरुणाचा रिंकी आणि पिंकी यांच्या कुटुंबियांशी संपर्क आला. काही दिवसांपूर्वीच रिंकी आणि पिंकीच्या वडिलांच निधन झालं. त्यानंतर या दोघी बहिणी आईसोबत राहत होत्या. यावेळी त्यांच्या कुटुंबाला लागणारी मदत करत आजारपणात अतुलने त्यांची सर्वांची काळजी घेतली. त्यामुळे त्याची त्यांच्याशी जवळीक वाढत गेल्याने पुढे त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
रिंकी आणि पिंकी या दोघी उच्चशिक्षित असून आयटी इंजिनिअर आहेत. तसेच एकाच आयटी कंपनीत नोकरीलाही आहेत. रिंकी आणि पिंकी या जुळ्या बहिणी असल्याने त्यांना पुढेही कायम एकत्र राहायचं होतं. एवढंच नाही तर त्या आत्ता देखील एकाच ताटात जेवतात. त्या जुळ्या असल्यानं त्यांचं एकमेकींशी एवंढ घट्ट नातं आहे. त्यामुळे या पुढे देखील त्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेत एकाच मुलाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. रिंकी आणि पिंकींच्या या निर्णयाला घरच्यांनी देखील मान्यता दिली. मग काय दोन डिसेंबरला अकलूजमध्ये (Akluj) एका मंगल कार्यालयात त्यांचा विवाह पार पडला.
गुन्हा का दाखल झाला?
अतुल आवताडे या तरुणाने एका वेळी दोन मुलींशी लग्न केलं. त्यानंतर या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. पण एका व्यक्तीने तक्रार दाखल केल्याने अतुलच्याविरोधात भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 494 नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे या जुळ्या बहिणींशी लग्न करणारा अतुल संसाराला सुरुवात करण्यापूर्वीच अडचणीत आला आहे.
दरम्यान, या जुळ्या बहिणींनी एकाच मुलाबरोबर लग्न केल्यामुळे सोशल मीडियावर (Social media) मिम्सचा अक्षरश: पाऊस पडला आहे. खरं तर हे लग्न पार पडले असले तरी लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरदेवावर गुन्हा दाखल झाल्यामुळे नव्या संसाराला सुरुवात करण्याआधीच त्यांच्या आनंदावर विरजण पडल्याने पुन्हा एकदा या लग्नाची चर्चा रंगली आहे. (Two Sisters Marry One Man)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.