ACB trapp Latest News
ACB trapp Latest News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

४० हजारांची लाच मागणारा तलाठी ACB च्या जाळ्यात

सरकारनामा ब्यूरो

कऱ्हाड : ऑनलाइन सातबारा उताऱ्यावर नाव दुरुस्ती करण्यासाठी ४० हजार रुपयांच्या लाचेची (bribe) मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत विभागाने (ACB) येथील तलाठ्यांवर कारवाई केली. सागर दत्तात्रय पाटील असे संबंधित तलाठ्याचे नाव असल्याची माहिती लाचलुचपत विभागाने दिली आहे. (ACB trapp Latest News)

लाचलुचपत विभागाने दिलेली माहिती अशी की, शहरातील एकाने खरेदी केलेल्या प्लॉटवर संबंधित व त्याचे भाऊजी यांचे ऑनलाइन सातबारा उताऱ्यावर नाव दुरुस्ती करायची होती. त्यासाठी तलाठी सागर पाटील यांनी संबंधिताकडे ४० हजार रुपयांची मागणी केली होती.

संबंधिताने त्याची माहिती लाचलुचपत विभागाकडे दिली. त्याची लाचलुचपत विभागाकडून खात्री करण्यात आली. त्यानुसार आज पोलिस उपअधीक्षक सुजय घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विक्रम पवार, पोलिस नाईक प्रशांत ताटे, विशाल खरात यांनी तलाठी सागर पाटील याच्यावर कारवाई करून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT