Crime news in Satara, Satara Crime news in Marathi, Satara Latest Marathi News
Crime news in Satara, Satara Crime news in Marathi, Satara Latest Marathi News 
पश्चिम महाराष्ट्र

औंध पोलीस ठाण्यात थरार; लॉकअपचे दार तोडून आरोपी फरार

सरकारनामा ब्युरो

crime news in Satara

औंध : सातारा जिल्ह्यातील औंध पोलिस ठाण्याचे लॉकअप तोडून दरोड्यासारख्या गंभीर गुन्ह्यातील संशयित आरोपी पळून गेल्याची माहिती समोर आली आहे. राज्याचे गृहमंत्री जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना ही घटना घडल्याने पोलिस दलही गॅसवर गेले आहे. (Satara Crime news)

मिळालेल्या माहितीनुसार, सचिन भोसले, राहुल भोसले, अजय भोसले, अविनाश भोसले, होमराज भोसले (सर्व रा. बीड व अहमदनगर जिल्हा) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. लॉकअपचे दार तोडल्यानंतर पाच दरोडेखोरांनी पोलिस ठाण्यातील पोलिसांना मारहाण केली. ही घटना पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास घडली. संशयित आरोपी वरुड व सि.कुरोली परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून सकाळीच पोलिसांचे एक पथक वरुड येथे संशयितांना पकडण्यासाठी गेले आहे.

संशयित दरोडेखोरांना नुकतेच गंभीर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. पोलिस कोठडीत असल्याने त्यांना लॉकअप मध्ये ठेवण्यात आले होते. आज पहाटे मात्र ताकदीच्या जोरावर दरोडेखोरांनी लॉक अपचे दार तोडून पोलिसांना मारहाण करत औंध पोलिस ठाणे हादरवून सोडले. या घटनेची माहिती समोर आल्यानंतर सातारा पोलिस दल अलर्ट झाले असून दरोडेखोरांच्या शोधासाठी पथके रवाना झाली आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT