Shambhuraj Desai sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara : न्यायालयाच्या आदेशानेच कारवाई; कबरीचा मुळ ढाच्या हालवणार नाही... देसाई

हा नियमित कामकाजाचा भाग part of regular operations असून अनेक दिवसांपासून हे काम सुरू होतं. आज त्याला अंतिम स्वरूप आले आहे.

Umesh Bambare-Patil

सातारा : प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या कबरीच्या मुळ ढाच्याला हात न लावता परिसरात झालेले अतिक्रमणे काढण्यात येत आहेत. ही नियमित कारवाई असून सुप्रिम कोर्टाच्या आदेशानुसार हे अतिक्रमण हटविले जात आहे. त्याला आजच औचित्य साधत हे काम होतय असे नाही, अशी प्रतिक्रिया साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खान याच्या कबर व परिसरातील अतिक्रमणे आज जिल्हा प्रशासनाने न्यायालयाच्या आदेशाने काढली. यासंदर्भात हिंदुत्ववादी संघटनांनी शिंदे, फडणवीस सरकारचे आभार मानले असून त्यांच्या इतक्या वर्षांच्या आंदोलनाला यश आल्याचे सांगितले जात आहे. याविषयी राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याशी संपर्क केला त्यांनी प्रतिक्रिया दिली.

शंभूराज देसाई म्हणाले, प्रतापगडाच्या पायथ्याशी ही कबर आहे. त्याच्या मूळ ढाच्याला हात लावला जाणार नाही. आतमध्ये असणारी कबर व त्याचा ढाचा यांना कुठेही हात लावला नाही. या परिसरात असणारे वाढविलेले बांधकाम, वाढविलेली जागा आणि वाढविलेले काम हे अनाधिकृत आहे. हे सुप्रिम कोर्टाने मान्य केलं आहे. सुप्रिम कोर्टाकडून अतिरिक्त बांधकामे हटविण्याचे आदेश सरकारला दिले आहेत. त्यामुळे कोर्टाचे म्हणणे ऐकणे प्रशासनाचे काम आहे आणि ते काम पूर्ण करत आहेत.

हा नियमित कामकाजाचा भाग असून अनेक दिवसांपासून हे काम सुरू होतं. आज त्याला अंतिम स्वरूप आले आहे. नियमित कामकाजाचा भाग आहे आजच औचित्य साधत हे काम होत आहे, असं नाही. हे बऱ्याच दिवसांपासून काम चालू आहे. जे अनाधिकृत आहे ते अनाधिकृत आहे. ते काढलं पाहिजे आपण रस्त्याचे रूंदीकरण करताना अतिक्रमण हटवतो तसंच हे काम आहे, असे त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT