Encrochment on Vardhangad  sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Khatav News : वनविभागाची कारवाई; वर्धनगडावरील दर्ग्याभोवतालचे अतिक्रमण हटवले

Satara Collector वर्धनगडावर असलेल्या दर्ग्याभोवती वनविभागाच्या हद्दीत करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम हटविण्यात यावे अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती.

Umesh Bambare-Patil

-ऋषिकेश पवार

Khatav News : ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या खटाव तालुक्यातील वर्धनगड किल्ल्यावर एका दर्ग्याभोवती वन विभागाच्या हद्दीत करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम आज हटविण्यात आले. कमालीची गुप्तता पाळत वन विभागाने दर्गा परिसरातील वाढीव अनधिकृत बांधकाम हटविण्याची कारवाई केली. यावेळी प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

वर्धनगडावर असलेल्या दर्ग्याभोवती वनविभागाच्या Forest Department हद्दीत करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम हटविण्यात यावे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे Satara Collector करण्यात आली होती. आज मंगळवारी पहाटे पोलिस बंदोबस्तात वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दर्ग्याभोवतालचे बांधकाम हटविण्याची कारवाई सुरु केली.

शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी गडावर जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले होते. सकाळी ११ वाजेपर्यंत दर्गा सोडून करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम हटविण्याची कारवाई पूर्ण करण्यात आली. तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखण्याचे पोलिसांनी आवाहन केले.

दरम्यान, १५०० फूट उंचीचा वर्धनगड किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. हा किल्ला साताराच्या महादेव डोंगर रांगेवरील भांडलीकुंडल नावाचा फाट्याजवळ (सध्याचा सातारा-पंढरपूर हायवे क्र. ५४८-सी) कोरेगाव व खटाव तालुक्याचा सीमेलगत बांधलेला आहे. काही ऐतिहासिक दस्तावेजानुसार या किल्ल्लयावर छत्रपती शिवाजी महाराजांचे १ महिना वास्तव्य होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT