Dhangar Reservation News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Dhangar Reservation News : धनगर आरक्षणाचा प्रश्न पेटला ; बीड जिल्ह्यातल्या सरपंचाने चौंडीत येऊन केले मुंडन !

Beed News : राज्यात सध्या एकाचवेळी मराठा, कुणबी, ओबीसी, धनगर आरक्षणावरून आंदोलनाची धग पेटली आहे.

राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar News : राज्यात सध्या एकाचवेळी मराठा, कुणबी, ओबीसी, धनगर आरक्षणावरून आंदोलनाची धग पेटली आहे. मराठवाड्यात मराठा-कुणबी, विदर्भात ओबीसी तर उत्तर-पश्चिम महाराष्ट्रात धनगर आरक्षणाची तीव्रता मोठी आहे. नगर जिल्ह्यात चौंडी इथे धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश केला जावा या मागणीसाठी गेल्या पंधरा दिवसांपासून यशवंत सेनेच्या कार्यकर्त्यांनी आमरण उपोषण आंदोलन सुरू केले आहे.

चौंडी इथे सुरू असलेल्या आंदोलनाला राज्यभरातील धनगर समाजाचे नेत्यांसह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी भेट देत पाठिंबा जाहीर केला आहे. बीड (Beed) जिल्ह्यातील नांदेवली येथील सरपंच अंकुश शेळके व त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी बुधवारी (20 सप्टेंबर) चौंडीत येत उपोषणस्थळी मुंडण करुन आंदोलनाला पाठिंबा दिला.

या वेळी बोलताना सरपंच शेळके यांनी राज्य सरकारकडून धनगर आरक्षणाबाबत निर्णय घेण्यास होत असलेल्या विलंबाबद्दल निषेध व्यक्त करत आंदोलनाला पाठिंबा म्हणून आम्ही मुंडन करत असल्याची भावना व्यक्त केली. दरम्यान, चौंडी इथे उपोषणाला बसलेले आण्णासाहेब रुपनवर यांची तब्येत खालावल्याने त्यांना नगरहून पुण्याच्या (Pune) ससून रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

चौंडी इथे उपोषण करत असलेले सुरेश बंडगर यांनी आजपासून पाणीत्याग केला आहे. राज्यसरकार (State government) आरक्षणाबाबत निर्णय तर दूर साधी बैठकही घ्यायला तयार होत नसल्याने धनगर समाजात रोष वाढत आहे. आज धनगर समाजाच्यावतीने खंबाटकी घाटासह राज्यभर रास्तारोको करण्यात आला आहे.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT